नंदुरबार| राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे नुसते स्वप्न बघितले नाही तर ते सत्यात उतरवले आणि स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या सांस्कृतिक मूल्याचे जगाला महत्व पटवून दिले अशा या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांचा आदर्श युवापिढीने घेऊन आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन साई कॉम्पिटीशन अकॅडमीचे संचालक प्रा. एन जी वसावे यांनी येथे केले.
नंदुरबार येथील विसरवाडी येथे साई कॉम्पिटीशन अकॅडमीतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी या थोर व्यक्तीमत्वांच्या कार्याला उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विसरवाडी येथील श्री गावित हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे मुख्यद्यापक एस एच सोनार हे उपस्थित होते.
प्रा. वसावे पुढे म्हणाले, स्वराज्य निर्मितीच्या मुख्य प्रेरणास्त्रोत राजमाता जिजाऊ असून त्यांनी लहनपणापासून शिवबांवर स्वराज्य निर्मितीचे ध्येय रुजवले, त्यासाठी पाठबळ दिले. स्वराज्याचे जे स्वप्न त्यांनी बघितले ते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून सत्यात उतरवले.
तसेच स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीचे महत्व जगाला पटवून देत तेथे सांस्कृतिक मूल्य रुजवली अशा या दोन्ही थोर व्यक्तींमत्वांचा सर्व युवापिढीने आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपले ध्येय प्राप्त करण्याच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहावे असे आवाहन प्रा. वसावे यांनी केले. विसरवाडी सारख्या ग्रामीण भागात साई कॉम्पिटीशन अकॅडमीची स्थापना झाली. येणाऱ्या पोलिस भरतीत साई कॉम्पिटीशन अकॅडमीचा निकाल शंभर टक्के लागेल असा विश्वास व्यक्त करुन ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचाय त्यांनी लवकरात लवकर व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे आवाहन ही केले. यावेळी अंकिता वसावे आणि वंदना पाडवी या विद्यार्थिंनी ही मनोगत व्यक्त केले.अधिक माहितीसाठी 7744922956 किंवा 7719088917 यावर संपर्क साधावा.