Skip to main content

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा शुक्रवारी ऑनलाईन दीक्षांत समारंभ

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षान्त समारंभ शुक्रवार दि. 29 जानेवारी 2021 रोजी नाशिक येथे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. 
University-of-Health-Sciences-online-convocation-ceremony-on-Friday
याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री मा.नामदार श्री. अमित देशमुख आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा विसावा दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या अधिसभागृहात सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले असून या समारंभात ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देतांना कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की,  विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 8064 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 85 सुवर्णपदक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या 03 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे मा. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 517, दंत विद्याशाखा पदवीचे 1926, आयुर्वेद विद्याशाखेचे 726, युनानी विद्याशाखेचे 80, होमिओपॅथी विद्याशाखेचे 943, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 509, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 134, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 13, बी.ए. एस.एल.पी. विद्याशाखेचे 34, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 03, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 03, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे 1051, एम.एस.मेडिकल विद्याशाखेचे 673,  डी.एम.मेडिकल विद्याशाखेचे 249, एम.सी.एच. मेडिकल विद्याशाखेचे 67, पी.जी.डिप्लोमा विद्याशाखेचे 262 आदी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

सदर दीक्षांत समारंभाचे https://t.jio/MUHS2021  वरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी सदर दीक्षांत समारंभाचे प्रक्षेपण ऑनलाईन पहावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...