Skip to main content

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध संस्थांनी आर्थिक योगदानासाठी पुढे यावे: ना. भुजबळ

नाशिक| 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शासनाच्यावतीने जवळपास दोन कोटींची मदत उपलब्ध झाली आहे. परंतु संमेलनास अजून निधीची आवश्यकता असल्याने नाशिकमधीन विविध संस्थांनी संमेलनात आपले आर्थिक योगदानासाठी पुढे यावे, असे आवाहन अन्न राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निधी संकलनाबाबतची आढावा बैठक पालकमंत्री श्री.भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिक्कुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, साहित्य संमेलनाचे समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, संमेलनाचे मुख्य समन्वयक नितीन मुंडावरे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, विश्वास ठाकूर, दिलीप खैरे, राजाराम पानगव्हाणे,यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
For-the-success-of-the-meeting-various-organizations-should-come-forward-for-financial-contribution-minister-Bhujbal
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले,  61 वर्षाच्या कालावधीनंतर नाशिक शहरात 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यासाठी  हि अभिमानस्पद बाब आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेबरोबरच याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिककराची आहे. त्यामुळे शहरातील विविध संस्थांनी व नागरिकांनी आर्थिक योगदानासाठी पुढे येवून लोकसहभाग वाढवावा. तसेच शहरातील हॉटेल चालकांनी देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राहण्याची, नास्ता व जेवणाची सोय करावी, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी बैठकित सांगितले.

संमेलनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना

साहित्य संमेलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. सर्व मराठी साहित्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या दुप्पट होणार आहे. तीन दिवसीय साहित्य संमेलेनास देशातून व राज्यातून अनेक साहित्यिक,लेखक ,कवी व रसिक मंडळी हजेरी लावणार आहेत. नाशिक शहराला साहित्य परंपरेबरोबरच परंतु जिल्ह्यांत आता अनेक धार्मिक पर्यटन स्थळही विकसित झाली आहेत.संमेलनासाठी येणारा प्रत्येक माणूस नाशिक मध्ये आल्यानंतर पर्यटन करुनच जाणार आहे. त्यामुळे उद्योगधंदा पर्यटन वाढणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री.छगन भुजबळ यांनी सांगितले.


बालसाहित्य’ मेळावा ठरणार संमेलनाचे आर्कषण

साहित्य समंलेनात सर्वच वयोगटातील लोकांचा  सहभाग असणार आहे. या ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून 400 स्टॉल्स उभारले जाणार असून याव्यतिरिक्त  पर्यटन, चित्रकला, शिल्पकला, प्रकाशन कट्टा, कवीकट्टा यासाठी सुद्धा वेगवेगळ्या हॉल्सची उभारणी करणयात येणार आहे. कवीकट्टयात आपल्या कविता सादर करण्यसाठी आजपर्यंत 1 ‍हजार 532 कविता प्राप्त झाल्या आहेत. संमेलनात बालगोपाळांसाठी 3 दिवसीय बालसाहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून यासाठी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित रहाणार आहे. त्यामुळे संमेलनातील ‘बालसाहित्य’ मेळावा संमेलनाचे आर्कषण ठरणार असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले.


जगभरातील मराठी साहित्यिकांना संमेलनाची उत्सुकता: सूरज मांढरे

समाजमाध्यमांमुळे साहित्य संमेलनाची प्रसिध्दी सातासमुद्रापार जाणार आहे. विदेशातील साहित्यिकांनाही नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत कमालीची उत्सुकता आहे. यादृष्टीन संमेलन यशस्वीतेसाठी सहभाग घेवून आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्याला 151 वर्षपूर्ण झाली असल्याने जिल्ह्याच्या नावलौकिकाला साजेसा कार्यक्रम होणे आवश्यक असून साहित्य संमेलनाने ती संधी मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.




Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...