नाशिक| अंबड पोलीस ठाणे हद्दीतील कामटवाडे या ठिकाणी निर्बंधाचे पालन होत नसल्याने पोलिसांनी हॉटेल गंगोत्री बारवर करवाई करून सील ठोकले. त्यात १९ मद्यपींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरले असून धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहर परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते विभाग 3, गुुन्हेे शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व अंबड पोलीस ठाण्याचे अंमलदार याच्यासह नाशिक महानगरपालिका पथकासोबत संचलन करण्यात आले.
तसेच निर्बंध न पाळणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली, त्यात हॉटेल गंगोत्री बारवर छापा टाकून एकोणवीस लोकांवर पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारणी करण्यात आली, तसेच सदर हॉटेल गंगोत्री बार हे पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे.