नाशिक| गरीब व मध्यम वर्गीय कोरोना रुग्णांचा आधार ठरलेल्या महापालिकेच्या बिटको कोविड रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय दूर करून सोई-सुविधा देण्याची मागणी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी निवेदनाद्वारे केली होती.
त्याच अनुषंगाने आज महापालिकेचे स्थायी सभापती गणेश गीते यांनी बिटको रुग्णालयाचा दौरा केला यात असे निदर्शनात आले अतिदक्षता विभागात संख्येपेक्षा जास्त रुग्ण असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता दिसून आली रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांच्याकडून त्याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच त्यांनी कर्मचारी व वैद्यकीय स्टाफ वाढवावा अशी स्थायी सभापती गणेश गीते यांच्याकडे करण्यात आली.