- दिंडोरी लसीकरण केंद्राची खा.डॉ.भारती पवार यांच्याकडून पाहणी - TheAnchor

Breaking

March 30, 2021

दिंडोरी लसीकरण केंद्राची खा.डॉ.भारती पवार यांच्याकडून पाहणी

नाशिक| सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खा. डॉ.भारती पवार यांनी दिल्ली येथील अधिवेशन आटोपून तात्काळ आपल्या मतदार संघातील कोविड सेंटर दिंडोरीची पाहणी केली.
Inspection-of-Dindori-Vaccination-Center-by-Dr-Bharti-Pawar
तेथील  कोविड-19 लसीकरण विभागाला भेट देत तेथे रुग्णांना लसीकरण करत असताना प्रत्यक्ष पाहणी केली व वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील यांच्याशी चर्चा केली. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयमार्फत आत्तापर्यंत जवळपास ३५०० नागरिकांना लस देण्यात आली आहे. या कामाबद्दल खा. डॉ.भारती पवार यांनी संपूर्ण कर्मचारी वर्गाचे आभार मनात समाधान व्यक्त करून पुष्प गुच्छ देऊन सत्कार देखील केला. ,
त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांनी देखील व्हॅक्सिनेशन सेंटर कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी तालुका अध्यक्ष नरेंद्र जाधव, शहराध्यक्ष शाम मुरकुटे, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे, भास्कर खराटे, ग्रामीण रुग्णालय दिंडोरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, डॉ.काळे, नर्सेस यांसह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.