- अंबड १ तर उपनगर हद्दीत ६ आस्थापनांवर पोलिस- मनपाची संयुक्त कारवाई - TheAnchor

Breaking

March 31, 2021

अंबड १ तर उपनगर हद्दीत ६ आस्थापनांवर पोलिस- मनपाची संयुक्त कारवाई

नाशिक| शहरात रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आणि मनपा प्रशासन अँक्शन मोडमध्ये आहे. अंबड हद्दीत एक तर उपनगर हद्दीत सहा आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते आणि मनपा विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. अंबड आणि उपनगर हद्दीत प्रत्येकी एक आस्थापना सील ही करण्यात आली.
Joint-action-of-police-and-corporation-against-1-asthapana-in-Ambad-and-6-asthapna-in-upnagar-aria
अंबड पोलीस ठाणे हद्दीत विभाग ३ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या  मार्गदर्शनाखाली अंबड पोलीसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत विनामास्क फिरणार्‍या ३२ लोकांवर दंडात्मक कारवाई करून १६,००० रूपये दंड गोळा करण्यात आला. 
तसेच मनपा विभागीय अधिकारी मयूर पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत पोलिसांकडून करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत सोशल डिस्टंसिंगच्या ९ केसेसच्या माध्यमातुन - ४५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तसेच कामटवाडे येथील बालाजी किराणा दुकान हे पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे.

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत

तसेच मंगळवारी म.न.पा. पथकासोबत विना मास्क  फिरणाऱ्या १६ लोकांवर कारवाई करण्यात आली, तर निर्बंधाचे पालन न करणाऱ्या ६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यात एक आस्थापना सील करण्यात आली, त्यात एका मॉलचा समावेश आहे. या कारवाईत एकूण ३८००० रु. दंड करण्यात आला आहे.