नाशिक| ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या विदेशी कंपन्या भारतात ऑनलाईन व्यापार करतात त्याचा कोणताही लाभ देशाला होत नसून हा सर्व नफा विदेशात जात आहे. या विदेशी कंपन्या आपल्या विक्रीच्या 80 टक्के वाटा मोजक्याच कंपन्यांना देतात ज्यामुळे देशातील विक्रेत्यांना याचा कोणताही फायदा होत नाही, उलट छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान या कंपन्यामुळे होत असून या कंपन्यांना भारतात ऑनलाइन व्यापार करण्यास बंदी आणावी या मागणीचा पुनर्रच्चार कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सतर्फे करून त्यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
केंद्र शासनाच्या परकीय गुंतवणूक धोरणाअंतर्गत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, ई-पोर्टलवर माल मालविक्री करणाऱ्या प्रत्येक विक्रेत्यास पूर्ण विवरण भरणे जरूरीचे आहे, परंतु ॲमेझॉनवर ऑर्डर बुक केली की ती सरळ अमेझानकडे जाते. ते आपल्या मर्जीप्रमाणे विक्रेता निवडतो. जे या धोरणाचे उल्लंघन आहे, याआधी शासनाला अवगत करण्यात आले आहे. त्यामुळे आता नविन आदेश काढून विदेशी कंपन्यांच्या मनमानीला चाप लावण्याकरता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी नवीन धोरणात तरतुद करण्यात यावी अशी मागणी कॅटने केली आहे.
आज देशभरात कॉनफेडरेशन आॕफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने अमेझॉन व फ्लिपकार्ड या कंपन्यांच्या मनमानी विरोधात ट्रेडर्सतर्फे देशभरातील जिल्हा ठिकाणावर सकाळी ११ वाजता एकाच वेळी या कंपन्यांच्या पुतळ्याचे होळी सणाचे औचित्य साधून दहन करण्यात आले. झूम या ॲपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभारातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला, कॕटचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बि. सी. भरतीया, राष्ट्रीय सचिव प्रविण खंडेलवाल, राज्याचे सचिव महेश बखई, राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, महाराष्ट्र आणि तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व कॉन्फड्रेशन ऑफ ऑल इंडियाचे पदाधिकारी संजय सोनवणे यांनी ऑनलाईन भाग घेऊन निषेध व्यक्त केला अशी माहिती नाशिक कॅटचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी दिली.