मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर मंगळवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती. यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचे छायाचित्र शेअर केले आहे. त्यामध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्विट करून शरद पवार यांची प्रकृती स्थिर आल्याचे सूचित केल्याचे दिसते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन करीत आहेत.