Skip to main content

ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू; पालकमंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिक| कोरोनाचा फैलाव वाढत असतांना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अश्या भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाख व महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली.  


छगन भुजबळ हे आज सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालो असतांना दुपारी १२.३० च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, मनपा आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नगरगोजे, डॉ.आवेश पलोड, रंजन ठाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना विरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे. या रुग्णालयाची क्षमता एकूण १५० इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होते. १२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडली. त्यानंतर १.३० वाजरपर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आली. या दरम्यान दुर्दैवाने यात २२ लोक मृत्युमुखी पडले असुन ११ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर ११ ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. कोरोना विरुद्ध लढाई लढत असतांना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून  राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक  इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ,आणि एक सिनियर डॉक्टरचा  समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाख व महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत 

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख  व नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आपलं काम थांबणार नाही. अधिक नियोजन करून लढा सुरू राहील. या घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या लढाईत नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...