नाशिक| सावरकर नगर येथे बिबट्याचा संचार असल्याचे दिसले. येथील एका निवासस्थानाबाहेर बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान वनविभागाला पाचारण करण्यात येऊन बिबट्याला जेरबंद करण्यात आले. तीन तास हे थरार नाट्य चालले.
पूर्वी ही गंगापूररोड भागात अधून-मधून दर्शन घडत असते. दिंडोरीच्या खा. डॉ.भारती पवार यांच्या नाशिकच्या निवासस्थाना बाहेर ही या बिबट्याचे दर्शन झाले आहे.

