Skip to main content

ऑक्सिजन पुरवठयाअभावी या २२ रुग्णांचा झाला दुर्दैवी मृत्यू

नाशिक| मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुदैवी मुत्यृ झाला. नाशिक महानगरपालिकेचे डॉ. झाकिर हुसेन हे १५० बेडचे कोविड रुग्णालय असुन येथे आज सकाळी १० वाजता १५७ रुग्ण दाखल होते, पैकी १३१ रुग्ण  ऑक्सिजनवर,  १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर व ६१ रुग्ण क्रिटिकल होते. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासाठी १३ KL चा लिक्विड ऑक्सिजन टॅंक Taiyo Nippon या कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेला आहे. उपरोक्त कंपनीकडून सदरचा टॅंक हा १० वर्षाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आलेला असुन त्याची देखभाल दुरुस्ती व यामध्ये भरावयाचा लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही उपरोक्त कंपनीकडे आहे. सदरचा टॅंक  दि. ३१/०३/२०२१ रोजी कार्यान्वित केलेला आहे.


आज दुपारी सुमारे १२.३० वाजता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे टॅंकची पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजुला गळती आढळून आली. त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसुन आले. सदरची बाब रुग्णालयातील डॉक्टर यांनी तात्काळ माझ्या निदर्शनास आणून दिली. सदरची बाब लक्षात येताच गळती दुरुस्तीसाठी शहरातील निखील गॅसचे मालक श्री. शेटे व पिनॅकल कंपनीचे इंजिनीयर यांना तातडीने घटनास्थळी बोलाविण्यात आले. फायर टेंडर मधून पाणी फवारणी करून ऑक्सिजन  गळतीची जागा तज्ञांनी शोधली. सदर गळतीची पहाणी करुन गळती होणारा पाईपचा भाग दुरुस्त करुन पुन्हा जोडणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी सुमारे ०१.४५ ते ०२.०० वाजता सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात Taiyo Nippon या कंपनीचा लिक्वीड ऑक्सिजनचा टँकर दैनंदीन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यासाठी स्थळावर आलेला होता व त्यामधून लिक्वीड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आले. 

या कालावधीमध्ये ऑक्सिजन पुरवठयाअभावी दुर्देवाने 22 रुग्णांचा मुत्यृ झाला त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 

अ.क्र. वॉर्ड क्र. रुग्णाचे नांव रुग्ण दाखल दिनांक वय/लिंग
1C1+S.R.अमरदीप नगराळेे 13/4/2021 74/पु.
2.            भारती निकम 16/04/2021 44/स्त्री
3            श्रावण  रा.पाटील 11/04/2021 67/पु.
4        मोहन दे.खैरनार 14/04/2021 60/स्त्री
5 मंशी सु. शहा 16/04/2021 36/पु.
6 पंढरीनाथ दे. नेरकर 11/04/2021 37/पु.
7 C2 सुनिल झाळके 17/04/2021 33/पु.
8 सलमा शेख 06/04/2021 59/ स्त्री
9 प्रमोद वालुकर 08/04/2021 45/ पु.
10 आशा शर्मा 17/04/2021 45/ स्त्री
11 भैय्या सय्य्द 19/04/2021 45/पु.
12 C3 प्रविण महाले 28/03/2021 34/पु.
13 सुगंधाबाई थोरात 18/04/2021 65/ स्त्री
14 हरणाबाई त्रिभुवन 06/04/2021 65/ स्त्री
15 रजनी काळे 18/04/2021 61/ स्त्री
16 गिता वाघचौरे 03/04/2021 50/ स्त्री
17 बापुसाहेब घोटेकर 12/04/2021 61/पु.
18 C4 वत्सलाबाई सुर्यवंशी 20/04/2021 70/ स्त्री
19 नारायण इरनक 20/04/2021 73/ पु.
20 C5 संदिप लोखंडे 19/04/2021 37/पु.
21 बुधा गोतरणे 19/04/2021 69/पु.
22 वैशाली राऊत 18/04/2021 46/ स्त्री

यामध्ये एकूण १२ पुरूष व १० महिला हे ३३ वर्ष ते ७४ वर्ष दरम्यानचे असून ११ रुग्ण हे ऑक्सिजन बेडवरील व ११ रुग्ण हे व्हेंटीलेटर बेडवरील आहेत. मनपाच्या नविन बिटको रुग्णालयात ४ रुग्ण व शहरातील खाजगी रुग्णालयात १ रुग्ण  हलविण्यात आले. दरम्यान इतर ठिकाणचे डयुरा सिलेंडर व जंबो सिलेंडर मागवून त्यांच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा सुरु ठेवून रुग्णांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. सदयस्थितीत रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत चालू आहे, असे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.
           

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...