Skip to main content

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व युवक पदाधिकाऱ्यानी सज्ज व्हा: अंबादास खैरे

नाशिक| आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व युवक पदाधिकाऱ्यानी तयारी सुरु करण्याच्या तसेच  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम घेण्याच्या सूचना देत राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत राष्ट्रवादी भवन येथे ५० टक्के युवक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी युवक पदाधिकारी कै.शिवराज (सनी) ओबेरॉय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
All-youth-office-bearers-should-be-ready-for-the-upcoming-municipal-elections-Ambadas-Khaire



आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी तसेच १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापनदिन असून यानिमित्ताने शहरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेण्यात आली. जवळपास दीड वर्षापासून कोरोना महामारीने देशात थैमान घातले असून नाशिक मध्ये रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत होती. सद्यस्थितीत कोरोनाला आळा घालण्यात सर्वांना यश प्राप्त होत असून जनजीवन पूर्ववत होत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यास आगामी महानगरपालिका निवडणुक वेळेत होण्याची शक्यता असल्याने महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी त्याची रूपरेषा मांडण्यासाठी युवक राष्ट्रवादीची आढावा बैठक घेण्यात आली होती. 

कोरोना काळात युवक पदाधिकाऱ्यानी जनहितार्थ अनेक कामे केली असून ती कामे जनतेसमोर पोहचवून कामाचे मतात परिवर्तन करावे, त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ १.१ किलोमीटर स्मार्ट सिटीचा रस्ता बनविण्यात जवळपास तीन वर्षाचा कालावधी व १७ कोटीहून अधिक खर्च लागला. आता गर्दीच्या ठिकाणीचे रस्ते स्मार्ट सिटी कंपनीने  खोदण्यास सुरवात केली असून यास किती कालावधी लागेल याचे उत्तर स्मार्ट सिटी कंपनी कडे नाही. शहरातील विविध भागातील रस्ते विकास कामांच्या नावाखाली खोदण्यात आले परंतु ते तसेच सोडून दिले असून पावसाळ्यात मातीमुळे पुन्हा खड्डे होणार आहे. यामुळे जनतेत तीव्र नाराजी असल्याने जनतेच्या समस्यांसाठी आंदोलन करावे. अशी सूचना यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पदाधिकाऱ्याना दिली. जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करावा. तसेच प्रत्येक १५ दिवसांनी आढावा बैठक होणार असल्याची सूचना यावेळी खैरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत युवकांना संधी उपलब्ध होणार आहे. परंतु जो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आपले काम जनतेपर्यंत पोहचवून आपले नावलौकिक वाढवेल व बूथ कमिटी तयार करेल त्यालाच पक्ष संधी देण्यार असल्याचे संकेत यावेळी शहराध्यक्ष खैरे यांनी दिले

याप्रसंगी जय कोतवाल, नितीन निगळ, राहुल तुपे, सोनू वायकर, विशाल डोखे,निलेश भंदुरे, सागर बेदरकर, संतोष जगताप, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, डॉ.संदीप चव्हाण, किरण पानकर, संतोष भुजबळ, नवराज रामराजे, रेहान शेख, हर्शल चव्हाण, विशाल माळेकर, अविनाश मालुंजकर, अमोल सूर्यवंशी, प्रश्नांत नवले, संतोष गोवर्धने, कुणाल धस्ते, गणेश खोडे, चेतन दुखे, स्वराज हाके, अजय बागुल, सचिन मोगल, मिलिंद सोळंकी, गणेश गरगटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...