Skip to main content

भारत एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरक्षणाची निर्मिती: प्रा.रावसाहेब कसबे

नाशिक| भारत एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरक्षण निर्माण करण्यात आले. भारत एक राष्ट्र निर्माण करण्याची पहिली प्रक्रिया ही आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. आरक्षण नावाची गोष्ट केवळ ओबीसी आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या फायद्याची नाही तर ही एक राष्ट्र बनविण्याची प्रक्रिया आहे. ही जर प्रक्रिया नाकारली तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही असे मत ज्येष्ठ विचारवंत लेखक प्रा. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
Creation-of-reservation-to-make-India-a-nation-Prof-Raosaheb-Kasbe

ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात होत असलेल्या घडामोडी व वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय शिबिराच्या प्रथम सत्रात ज्येष्ठ विचारवंत लेखक रावसाहेब कसबे यांनी ओबीसी जनगणना व समाज जागृती या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक येथे आयोजित केलेल्या ऑनलाईन एकदिवसीय प्रबोधन शिबिराचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत लेखक रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत लेखक उत्तम कांबळे, ज्येष्ठ विचारवंत लेखक प्रा.हरी नरके, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, डॉ.कैलास कमोद, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.दिवाकर गमे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी,जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, नवनाथ वाघमारे, प्रा.नागेश गवळी, हर्षल खैरनार,पंढरीबाथ बनकर, अविनाश चौरे, विजय राऊत, प्रसाद सोनवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे म्हणाले की,  स्वातंत्र्य नंतरच्या काळात असे अराजक नव्हते असा आराजकत्व काळ आज बघायला मिळतो आहे. राष्ट्र सुरक्षित नाही, राज्य सुरक्षित नाही जात सुरक्षित नाही आणि माणूस सुरक्षित नाही. या अराजकचे सर्वात जास्त बळी या महिला ठरल्या आहेत. प्रत्येक माणसाच्या समोर प्रत्येक जातीच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धर्म शास्त्रावर आधारित राष्ट्र उभे करण्याचे काम गेल्या सात वर्षात झाले आहे. आज सर्वांपुढे स्वतःला सुरक्षित ठेवणे आणि जातीला सुरक्षीत ठेवणे आवश्यक झाले आहे.

आरक्षणाने जात घट्ट होते हे अनेकांचे म्हणणे होते. हे महात्मा फुले यांनी खोडून काढले, राजर्षी शाहू महाराज यांनी राजकारभारात काम केले त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले. महात्मा फुले यांनी राष्ट्र ही संकल्पना मांडली त्यानुसार राष्ट्र म्हणजे एकमय देश एखाद्याच्या पायात काटा रुतला तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. कुणावर अन्याय झाला असेल तर त्याच्यासाठी धावून जाणे असे राष्ट्र अशी भूमिका त्यांनी मांडली असे सांगत या देशाचे विसाव शतक हे सामाजिक अभिसरणाचे शतक असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, छगन भुजबळ हे एक झुंजार नेते आहे. ते जोखीम पत्करणारे नेते आहे. त्यांनी महाराष्ट्रात ती जोखीम पत्करली आणि ते त्यातून तावून सुलाखून निघाले. मात्र देशपातळीवरील नेतृत्वाची जोखीम ते पत्कारू शकले नाही. ही माझी खंत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.


ज्या लोककल्याणकारी राज्यावर आरक्षण टिकून आहे. ते लोक कल्याणकारी राज्य आज संपुष्टात आले आहे. आता करायचे काय असा प्रश्न आता उभा राहिला आहे. आरक्षणा बरोबरच हे लोक कल्याणकारी राज्य टिकणे आवश्यक आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. कारण आरक्षण रद्द झाले तर पुन्हा देश वर्णव्यवस्थेत अडकणार आहे. आरक्षण देण्याची गरज भासणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याची जबाबदारी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर दिली आहे. ही ऐतिहासीक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यास संबंधित संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली परंतु गेल्या महिन्यात ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण माननीय उच्च न्यायालयाने स्थगित केली. हा ओबीसी समाजावरील सर्वात मोठा अन्याय आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी आणि येणाऱ्या धोक्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन व्हावे, ओबीसी समाजातील सर्व जातींनी एकसंघ राहून लढा निर्माण करण्यासाठी प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...