Skip to main content

चालकांनी तणावमुक्त राहून वाहने चालवावीत: प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत

नाशिक| देशाच्या अर्थव्यवस्थेत चालक हा अतिशय महत्वाचा घटक असून दररोज आवश्यक त्या गरजू वस्तूंची उपलब्धता करून देण्यात त्यांचा मौलाचा वाटा आहे. वाहतूक क्षेत्रात काम करत असतांना चालकाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे चालकांनी आपण करत असलेल्या कामाबाबत न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. चालक करत असलेले काम हे अतिशय महत्वपूर्ण असून चालकांनी तणावमुक्त राहून वाहने चालवावीत असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वासुदेव भगत यांनी केले.
Corona-vaccination-of-300-drivers-per-day-from-Nashik-District-Transport-Association
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक यांच्या वतीने चालक दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी नारायण लॉन्स, कोणार्कनगर, नाशिक येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष पवार, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टचे उपाध्यक्ष विजय कालरा, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, सुभाष जांगडा, भारत टाकेकर, इंद्रपाल सिंग चड्डा, संजय सोनवणे, कल्पना शिंपी,महावीर मित्तल,सुनील बुरड,जे.पी.जाधव,रामभाऊ सुर्यवंशी, संजय राठी, महेंद्र सिंग राजपूत मनोज उदावंत,शंकर धनावडे, दिपक ढिकले,विनायक वाघ,दीपक ताकाटे, नाना पाटील, दलजीतसिंग मेहता, सूरज चिंचोले,माणिक मेमाणे, अवतार्सिग लोंगिया, दिपक पांडे,राजेश शर्मा,विजू खोळपे, सदाशिव पवार,कैलास शिंदे,गजानन सोसे,बजरंग शर्मा,किशन बेनिवाल, आमोल चव्हाण,सिद्धेश्वर साळुंके, इरफान सय्यद, विकास शेलार,नाना लभडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमप्रसंगी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ३०० चालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तसेच यावेळी चालकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. त्याचबरोबर २५ वर्ष अपघात रहित सेवा बजावणाऱ्या चालकांचा व वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला चालकांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वासुदेव भगत पुढे म्हणाले की,  केंद्र व राज्य शासन रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे आता अपघातांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत. मात्र यावर आपल्याला थांबता येणार नाही. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी चालकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यांनी वाहने चालवितांना योग्य ती काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त ठिकाणी नागरिकांनी देखील आपले कर्तव्य म्हणून अपघात ग्रस्ताचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक ती मदत करणे आवश्यक आहे. त्यातून अनेक नागरिकांचे जीव आपण वाचवू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले की, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने भारत भरात पहिल्यांदाच चालकांचा सन्मान व्हावा यासाठी कार्यक्रम सुरु केले. या कार्यक्रमामध्ये मला नेहमीच सहभागी होता आले याचे मी भाग्य समजतो. आज चालक दिन आपण साजरा करत आहोत. खरतरं प्रत्येक व्यक्ती हा चालक आहे. प्रत्येक व्यक्ती कुठल्या न कुठल्या प्रकराची वाहने चालवीत असतात. त्यामुळे आज हा प्रत्येक चालकाचा दिवस असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ट्रान्सपोर्ट क्षेत्रात परदेशात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे देखील आता या क्षेत्रात महिलांचा सहभाग नक्कीच वाढेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड म्हणाले की, चालक दिनाचे औचित्य साधत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदाच्या वर्षी चालक व चालकांचे संपूर्ण कुटुंब कोरोनापासून मुक्त रहावे यासाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविली आहे. त्याचबरोबर आरोग्य तपासणी व चालकांचा सन्मान देखील करण्यात आल्याचे सांगत ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असून यामध्ये चालकांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, चालकांना वाहतूक करत असतांना दर १०० किलोमीटर अंतरावर विश्रांतीगृह निर्माण करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरात ट्रक टर्मिनलची व्यवस्था असावी जनेकरून याठिकाणी वाहनांची अधिक गर्दी होणार नाही. अपघात टाळले जातील आणि चालकांना देखील सुविधा उपलब्ध होतील. नाशिक तसेच सिन्नर येथील एमआयडीसीमध्ये राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल उभे करण्यात यावे यासाठी देखील नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी उद्योगांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन करत ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत आपण लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सादरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुभाष पवार यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात वाहतूक व्यवसाय पूरक कंपन्या टाटा मोटर्स, इंडूलूब ऑईल, श्रीराम फायनान्स आदी कंपन्यां सहभागी झालेल्या होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन चेअरमन संजू राठी व सह.चेरमन महेंद्रसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...