त्र्यंबकेश्वर| तळवाडे तूपादेव त्र्यंबकेश्वररोड येथील आधारतीर्थ अनाथाश्रमात लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व अन्न वाटप करण्यात आले या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक श्री त्र्यंबकराव गायकवाड उपस्थित होते आश्रमातील मुलांनी रोहित दादा पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्र तसेच कालभैरव स्तोत्र पठण करून शुभेच्छा दिल्या.
त्याप्रसंगी पुरुषोत्तम भाऊ कडलक जिल्हाअध्यक्ष, कैलास मोरे तालुका अध्यक्ष युवक, बाळा निगळ विधानसभा अध्यक्ष सातपूर, कपिल भावले जील्हा उपाध्यक्ष, विजय गांगुर्डे शहर अध्यक्ष, गोरख ढोकणे अमोल वाघमारे , अक्षय भोसले, कारभारी कोठूळे, अमोल महाले, संदेश भागवत,अर्जुन खांडबहाले आदी उपस्थित होते.



