Skip to main content

नाशिक, निफाड येथे ऑक्सिजन प्लॅन्टचे डॉ. भारती पवार यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक| सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय नाशिक आयोजित भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत देशभरातील विविध ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्टचा लोकार्पण सोहळा भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय निफाड व नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लँटचे लोकार्पण  केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांचे हस्ते करण्यात आले. 
Oxygen-Plant-at-Niphad-Nashik-innogration-by-central-health-minster-Bharti-Pawar
मोदींजींच्या नेतृत्वाखाली भारत देश हा अन्य सर्वच क्षेत्रातील प्रगती बरोबरच आरोग्य क्षेत्रातही भरीव कामगिरी करत आहे. आरोग्याच्या अनेक सुविधा सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यासाठी भविष्यातील कोविड-19 तथा अन्य आरोग्याच्या येणाऱ्या संभाव्य  रोगराईचा  सामना करण्यासाठी भारत देश सक्षमतेकडे वाटचाल करत असल्याचे ना.डॉ.भारती पवार यांनी या प्रसंगी सांगितले. 

या कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे महापौर सतीश नाना कुलकर्णी, आ.देवयानी फरांदे, आ.सीमाताई हिरे, डॉ.राहुल आहेर, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.श्रीवास, सहाय्यक खाजगी सचिव ओमप्रकाश शेटे, डॉ निखिल सैंदाने, स्वाती भामरे, जगन अण्णा  कुटे, गणेश कांबळे आदी उपस्थित होते. रुग्णांसाठी आता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन PSA प्लँटची उभारणी करण्यात आली असून भविष्यातील संकट बघता हे ऑक्सिजन प्लँट रुग्णांसाठी वरदान ठरतील असे ना.डॉ.भारती पवार यांनी निफाड येथील ऑक्सिजन प्लँटच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी सांगितले. 

निफाड येथील लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेव क्षीरसागर,  भाजपा जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर, आ.दिलीप बनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, राजाभाऊ डोखळे, प्रांत अर्चना पठारे, तहसीलदार घोरपडे, डॉ. राठोड, महिला भाजपा जिल्हाध्यक्ष सुवर्णताई जगताप, निफाड तालुका भाजपा अध्यक्ष भागवातबाबा बोरस्ते, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, बापू पाटील, संपत नागरे, सारीका ताई डेरले, संजय वाबळे, वैकुंठ पाटील, जगन आप्पा कुटे, लक्ष्मण निकम, शंकर पीठे, विलास मत्सगार, संजय गाजरे, आदेश सानप, रवी सानप, संजय धारराव तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...