Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

जागतिक एड्स दिन विशेष: भारताचा एच.आय.व्ही विरोधातील लढा

जगात १ डिसेंबर जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून आपण एच आय व्ही एड्स संबंधी माहिती जाणून घेत आहोत. एचआयव्ही संक्रमण होण्याचे प्रमाण भारतात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे 20 सप्टेंबर 2020 च्या संकलित माहितीनुसार जागतिक पातळीवर भारताचा 80 वा क्रमांक लागतो. तर जागतिक पातळीवर एच आय व्ही संक्रमणाच्या यादीत सर्वाधिक एचआयव्ही संक्रमनाने बाधित असणारे देशात अग्रक्रमी दक्षिण आफ्रिका व नायजेरिया या देशांचा समावेश आहे 2019 च्या आकडेवारीनुसार सध्या भारतात 23.49 लाख व्यक्ती एचआयव्हीसह जगणाऱ्या आहेत, यात 15 ते 49 वया मधील 0.22 टक्के व 79 हजार बालके जवळजवळ 3.4 टक्के आहेत. तर 9.94 लाख 44 टक्के महिलांचा समावेश आहे. Photo credit:msacs भारतात 2019 मधील एचआयव्ही सेंटिनल सर्वेक्षणांमध्ये आढळून आले आहे की 2010 च्या तुलनेत 37 टक्क्यांनी एचआयव्ही संक्रमण होण्याच्या संख्येत घट आली आहे, ही आपल्यासाठी समाधान देणारी बाब आहे तसेच एचआयव्हीसह जगणारे उपचार सातत्य असणारे व्यक्तींच्या मृत्यु दरात ही घट आली आहे. वर्ष 2010  तुलनेत 2019 पर्यंत 66 टक्के पर्यंत मृत्यू प्रमाणा...

94 वे साहित्य संमेलन: नो पास नो तिकीट प्रवेश सर्वांना खुला; संमेलनस्थळी नो मास्क नो एंट्री

नाशिक| 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तमामा नागरिकांना निमंत्रण असून प्रवेश खुला आहे. त्यासाठी स्वतंत्र पास, तिकीट अथवा तत्सम बाबीची काेणती गरज असणार नाही. मात्र काेराेनाच्या अनुषंगाने शासनाने जे निर्बंध जारी केले आहेत, जसे लसीकरण झालेले असणे आणि मास्कचा वापर करणे इत्यादी याचे पालन सर्वांनी करुन सहकार्य करावे असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरीयंटमुळे चिंता वाढली असून या नाशिकमध्ये होणार्‍या साहित्य संमेलनावरही त्याचे परिणाम पहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी बैठक घेतली असून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी मास्क घालने आणि लसीकरण केल्याशिवाय प्रवेश नाही असा निर्णय घेतला आहे.  या संमेलनासाठी नाशिकच्या विविध ठिकाणाहून तीनही दिवस बसेसची व्यवस्था केलेली आहे. या बसेस सकाळी 8 वाजेपासून सुटणार असून त्या साधारण दर 15 मिनीटांनी उपलब्ध हाेतील. सविस्तर माहिती साेबत जाेडली आहे.  काही प्रतिनिधी संमेलन स्थळी येऊन ऐनवेळेस प्रतिनिधी शुल्क भरु शकतात.त्यांना असे शुल्क तेथे भरता येईल. बाहेर गावाहून काही प्रतिनिधींना...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर संघटकपदी मंदा काकडे यांची वर्णी

नाशिक| राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेसतर्फे शहर संघटकपदी सौ. मंदा  काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब. मा.ना.श्री. अजितदादा पवार, मा.ना.श्री. छगनरावजी भुजबळ, मा.खा.सौ. सुप्रियाताई सुळे व महिला प्रदेशाध्यक्षा मा.सौ.रुपालीताई चाकणकर यांना अभिप्रेत असणारी महिला संघटना बांधण्यासाठी व पक्ष वाढीसाठी आपण सतत प्रयत्नशील रहाल अशी अपेक्षा व्यक्त करून पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न कराल असा विश्वास आहे, असे सौ. अनिता महेश भामरे यांनी म्हटले आहे.

व्यापाऱ्यांवर लागू केलेली दंड आकारणी रद्द करा: ललित गांधी यांची मागणी

नाशिक| कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची केलेली तरतूद ही राज्यात व्यापारी वर्गांमध्ये नाराजी निर्माण करणारी व अराजकाला आमंत्रण देणारी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.  सदर तरतूद ही व्यापारयांच्यावर अन्याय करणारी असून अतार्किक आहे. व्यापारी आपल्या आस्थापनांमध्ये लसीकरण पूर्ण केलेल्या ग्राहकांनाच  प्रवेश देतील. या संदर्भातले आवश्यक ते प्रबोधन ही करतील. परंतु एखाद्या ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला देणे हे कुठल्याही पद्धतीने तर्कसंगत नाही. त्यामुळे सरकारने दंडाची ही तरतूद त्या त्या व्यक्तीला लागू करावी. व्यापारी आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद तात्काळ रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदनाद्वारे केली आहे.  ग...

ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही: मंत्री छगन भुजबळ

पुणे| माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्व प्रथम मंडल आयोग लागू करण्यात आला. त्यातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात ओबीसींचे आरक्षण आपल्याला मिळाले. मात्र केंद्र सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे हे आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे. कोरोनामुळे केंद्र सरकार २०२१ ची जनगणना सुरू करत नाही. मात्र महाराष्ट्र सरकारला करण्याचा आग्रह धरत आहे. सरकारने ही जनगणना होईपर्यंत आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे अशी मागणी करत ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे असा ठराव पारित केला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढचे मुख्यमंत्र...

आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांची काटेकोर चाचणी करा: मुख्यमंत्र्याचे निर्देश

मुंबई| कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. Photo: file आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. “कुछ नही होता यार” असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न...

आयफोनची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश: ४२ कोटीचा साठा महसूल गुप्तचर यंत्रणेकडून जप्त

नवी दिल्ली| अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी 26 नोव्हेंबर रोजी दोन मालाची तपासणी केली. हा माल हॉंगकाँगहून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC), आला होता. आयात मालाच्या दस्तऐवजांमध्ये हा माल "मेमरी कार्ड" म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्ष तपासणीत असे दिसून आले की मालामध्ये खालील वस्तू होत्या अशा प्रकारे, रोखलेल्या मालामध्ये एकूण 3,646 (तीन हजार सहाशे सेहेचाळीस) आयफोन-13 मोबाईल फोन सापडले. कागदपत्रात नमूद न केलेले वर उल्लेख केलेले मोबाईल फोन आणि ऍपल स्मार्ट घड्याळ,या वस्तू सीमा शुल्क कायदा, 1962 अंतर्गत जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे रु. 42.86 कोटी रुपये होती तथापि मालाचे घोषित मूल्य फक्त 80 लाख रुपये होते. आयफोन 13 मॉडेल सप्टेंबर 2021 पासून भारतात विक्रीसाठी आले, ज्याची मूळ किंमत रु. 70,000/- रुपये होती आणि काही उच्च श्रेणीतील मॉडेल्सची किंमत 1,80,000 रुपये होती. भारतात मोबाईल फोन्सच्या आयातीवर 44% प्रभावी सीमाशुल्क लागू होते. तस्कर आयफोन 13 सारख...

नव्या ओमिक्रॉन व्हायरसमुळे चिंतेत भर: राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई | कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी  करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. FILE PHOTO संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता : तिकोट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते  इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे,कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्...

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये सानुग्रह सहाय्य: मंत्री विजय वडेट्टीवार

मुंब ई|   सर्वोच्च न्यायालयाने     दिनांक   ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५० , ०००/- रूपये (रु. पन्नास हजार )     इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी आपत्ती व्यवस्थापन   ,   मदत व पुनर्वसनमंत्री     विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य शासनाने     मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना     तयार      केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात     जमा     होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड-१९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५० , ०००/- (रु. पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात     येणार आहे. हे सानुग्रह सहाय्य देण्याकर...

संमेलनाची सर्व तयारी ३० तारखेच्या आत पूर्ण करण्याच्या मंत्री भुजबळ यांच्या सूचना

नाशिक| कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाच्या ठिकाणी सुरू असलेल्या मुख्य सभामंडपा उभारणीच्या कामांची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली. यावेळी साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी ३० तारखे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित व्यवस्थापकांना दिल्या. यावेळी जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनासाठी जर्मन पद्धतीचा मंडप घालण्यात येत असून अतिशय मजबूत स्ट्रक्चरची उभारणी करण्यात येत आहे. अतिशय भव्य दिव्य असलेल्या या सोहळ्यासाठी अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे सर्व कामकाज ३० तारखेच्या आत पूर्ण करण्यात येणार असून साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर होणारे कार्यक्रम मुख्य स्टेजवर करण्यात येणार आहे. त्यातून सर्व तांत्रिक बाबींची तपासणी देखील होणार असल्याच...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ: मंत्री अनिल परब यांची घोषणा

मुंबई| एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.  संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक,  वाहक,  यांत्रिकी कर्मचारी  व लिपिकांच्या पगारात सुमारे 7200 रुपयांपासून 3600 रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री, अॅड. परब यांनी आज झालेल्या पत्रकार परीषदेत केली. एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे. तसेच यापुढे कामगारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यत होण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे, असे सांगतानाच कामगारांनी आता संप मागे घेऊन तातडीने कामावर रूजू होण्याचे आवाहनही श्री. परब यांनी यावेळी केले. श्री. परब म्हणाले,एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे  ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.  प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी कामावर रूजू होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू व्हावी यासाठी कामगारांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, त...

छत्तीसगढचे ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव; २८ नोव्हेंबरला पुण्यात पुरस्कार वितरण

मुंबई| पुणे| अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्का...

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई| राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश...