नाशिक| ९४ व्याअखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस असून उद्या दि. ५ रोजी समारोपासाठी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि खा.शरद पवार.पाहुणे नाशकात दाखल झाले आहे. यावेळी आयोजकांच्या हस्ते त्याचे स्वागत करण्यात आले.
साहित्य संमेलन शेवटच्या टप्प्यात आले असताना नाशिककरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. संमेलन समारोप दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि खा.शरद पवार यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे समारोप करताना हे मान्यवर कोणते विचार व्यक्त करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. श्री नरेंद्र चपळगावकर हे केवळ साहित्यिक नसून न्यायमूर्ती असल्याने ते लेखन स्वातंत्र्य संदर्भात काय मत व्यक्त करतात आणि शरद पवार काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.