Skip to main content

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करा: सुभाष देसाई

औरंगाबाद|प्रशिक्षणार्थींना नवनवीन कल्पना घेऊन उद्योग विकसित करावयाचा असतो. उद्योग, व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन आवश्यक असते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात येते. त्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींसमोर काही अडचणी असतात. त्या सोडविण्याचे व उद्योग उभारण्याचे मार्गदर्शन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून होण्यास मदत होते.  त्यामुळे प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणीच जिल्हानिहाय इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी, अशा सूचना उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योग विभागाला केल्या.  
Create-Incubation-Centers-in-Maharashtra-Entrepreneurship-Development-Centers-Subhash-Desai

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या उद्योजक निवास येथे बांधण्यात आलेल्या विस्तारीत वस्तीगृह आणि डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन मंत्री देसाई यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मंत्री देसाई यांनी इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमास खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप आमदार जैस्वाल,  अतुल सावे,  उद्योग विभागाचे विकास आयुक्त तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विकास केंद्राचे कार्यकारी संचालक बा.त्रिं. यशवंते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात मंत्री देसाई यांच्याहस्ते निर्यातदार मार्गदर्शक पुस्तिका आणि उद्योजकता विकास केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या यशोगाथा पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले. तर नागपूर येथील अगरबत्ती क्लस्टरबाबत सविस्तर माहिती ऑनलाईन स्वरूपातून मंत्री देसाई यांना देण्यात आली.      

पालकमंत्री देसाई म्हणाले, औरंगाबादच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातून 2019 वर्षात 80 हजारांवर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. प्रशिक्षण घेऊन उद्योग व्यवसायही सुरू केले आहेत, याचा आनंद आहे. औरंगाबादमधील या प्रशिक्षण केंद्रांमधील सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचे समाधान मिळून प्रशिक्षणाचा व्यवसाय वृद्धीसाठी लाभ हाईल. या केंद्रामध्ये 300 प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणाची तर 100 प्रशिक्षणाची निवासी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.  जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या विकास केंद्राच्या वस्तीगृह बांधण्यासाठी मदत केली आहे. राज्यात इतर ठिकाणी उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यासाठी महामंडळ पूर्ण सुविधा उपलब्ध करून देईल. मात्र, केंद्र चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. त्यातून उद्योग वाढतील. सर्व प्रशिक्षणार्थींना कुशल बनविण्याचे ध्येय शासनाचे असून यामध्ये उद्योजकता विकास केंद्र मोलाची भूमिका पार पाडत असल्याचे गौरवोद्गारही मंत्री देसाई यांनी काढले. 

ठाणे येथे आंतरराष्ट्रीय आणि कळंबोली येथे राज्य पातळीवरील प्रशिक्षण केंद्रांमुळे प्रशिक्षणाची सोय प्रशिक्षणार्थींना झाल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले. डॉ. कांबळे यांनी उद्योजकता विकास केंद्राची वाटचाल आणि आगामी प्रकल्पांबाबत माहिती दिली. औरंगाबादेत उद्योजकतेला पोषक वातावरण असून जागतिक पातळीवरील प्रशिक्षणाची सोय याठिकाणी झाल्याने उद्योजकांमध्ये वाढ होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक सुरेश लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी दाशरथे यांनी केले. आभार यशवंते यांनी मानले. 

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...