Skip to main content

सिनेलाईन उद्योग समूहाच्या मूव्हीमॅक्सचा विस्तार

नाशिक| नाशिक मूव्हीमॅक्सच्या माध्यमातून प्रादेशिक मनोरंजनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. चित्रपट प्रदर्शनासह विविध प्रादेशिक उपक्रमांवर भर देऊन  विस्तार करण्याचा सिनेलाईन उद्योग समूहाचा मानस आहे.
Expansion-of-Moviemax-by-Cineline-Industries-Group-nashik-entertaiment

नाशिक येथील मूव्हीमॅक्स सिनेमागृहांमध्ये स्थानिक सामग्रीच्या प्रवाहाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. भारतात ११ मे २०२२ ला चित्रपट प्रदर्शन व्यवसायात पुन्हा प्रवेश करून, सिनेलाइन इंडिया लि.ने विविधतेसह मूव्हीमॅक्स विस्तारासाठी ताकदीने सज्ज झाली. कनाकिया समूहाचा एक भाग म्हणून, नाशिक येथील प्रिमियम सिनेलाइन मल्टिप्लेक्स, मूव्हीमॅक्स आता ग्राहकांच्या मागणीनुसार प्रादेशिक स्तरावर नाशिकला चित्रपट प्रदर्शन व विविध सुविधात्मक उपक्रम उपलब्ध करत आहे. नाशिकला जसे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसे महाराष्ट्रातील आणि आसपासच्या भागात अशा प्रकारचे मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे सिनेलाईनचे उद्दिष्ट आहे. समूहाचा थिएटरचा अनुभव अधिक समृध्द करण्यावर भर आहे.

महामारीच्या काळात चित्रपट प्रदर्शनाच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. अनेक प्रादेशिक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत होते. लॉकडाऊननंतर वैविध्यपूर्ण चित्रपट आणि त्याच्याशी निगडीत उद्योगांना व्यासपीठ खुलं झालं आहे. नाशिक येथील सकारात्मक शुभारंभानंतर महाराष्ट्रात इतर आठ ठिकाणी मूव्हीमॅक्सने चित्रपट प्रदर्शन व्यवसायात यशस्वीपणे पाऊल टाकले आहे. नाशिकमध्ये मराठी चित्रपटांची उत्सुकता वाढल्याने, ही मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या धर्मवीर आणि समरेणू हे चित्रपट प्रदर्शित करत आहेत. याव्यतिरिक्त येथे बॉलीवूड हिंदी चित्रपटांशिवाय तमिळ आणि तेलुगू चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत, तसेच प्रीमियम सुविधा उपलब्ध करून देत चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक उंचीवर नेण्याचा मूव्हीमॅक्सचा प्रयत्न आहे, त्यामुळे हे विविध चित्रपटांसाठी एक चांगले व्यासपीठ ठरणार आहे.

या प्रयत्नाविषयी बोलताना, चेअरमन श्री.राकेश कनाकिया म्हणाले “विविध चित्रपट उद्योगांना प्रोत्साहन देत चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्यांना व्यासपीठ ऊपलब्ध करून दिल्याचा आनंद होत आहे. आम्हाला वाटते की, हे आमच्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या योग्य पाऊल आहे. लॉकडाऊननंतर प्रादेशिक चित्रपट मोठ्या पाइपलाइनमध्ये असल्याचे लक्षात आले आहे. आमच्‍या थिएटरमध्‍ये प्रत्‍येक प्रदेशातील प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार सुविधा देण्याचा आणी  प्रादेशिक चित्रपट उद्योग अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...