Skip to main content

आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने आज ‘फॅशन शास्त्र 2022’ चे आयोजन

नाशिक|सौंदर्य शास्त्राशी निगडीत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची कवाडे नाशिककरांसाठी खुली करून देणाऱ्या आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि. ३०) ‘फॅशन शास्त्र 2022’ या मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकरोड वरील ग्रेप कौंटीच्या टर्फवर सायंकाळी रंगणाऱ्या या इव्हेंटच्या मोफत प्रवेशिका फॅशन प्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
IBT-International-Beauty-Academy-today-organized-Fashion-Shastra-2022
यासंदर्भात माहिती देताना अकॅडमीच्या संस्थापिका तथा व्यवस्थापकीय संचालिका भाग्यश्री धर्माधिकारी यांनी सांगितले, ‘फॅशन शास्त्र 2022’ कार्यक्रमाचे औचित्य साधून १२० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. अप्सरा या थीमवर आधारित फॅशन शो उपस्थितांना स्वर्गीय सौंदर्याच्या मॉडेल्सचे दर्शन घडवेल. यानिमित्त प्रथमच नाशिककरांना वैविध्यपूर्ण सौंदर्यवतींचे पदलालित्य अनुभवयास मिळणार आहे. याप्रसंगी मराठी, मुस्लीम, राजवाडी, बंगाली, क्याथलिक, दाक्षिणात्य, मणिपुरी आदी श्रेणींतील ब्रायडल लुक देखील वेगळेपण अधोरेखित करतील. या कार्यक्रमात रशिया, कोरिया, युक्रेन, दुबई आदी ठिकाणच्या मॉडेल्स आपापल्या अविष्काराचे सादरीकरण करणार असल्याचे भाग्यश्री धर्माधिकारी म्हणाल्या. सदर कार्यक्रमास पालकमंत्री दादाजी भुसे, खा. हेमंत गोडसे, माजी नगरसेवक रमेश धोंगडे यांची विशेष अथिती म्हणून उपस्थिती राहणार आहे.  

आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या नाशिक शहरात नाशिकरोड, इंदिरा नगर आणि गोविद नगर येथे शाखा अस्तित्वात आहेत. मेकअप, स्कीन, हेअर, सेमी-पर्मनंट मेकअप आदी श्रेणींसाठी अकॅडमीचा सार्वत्रिक लौकिक आहे. दरम्यान, आज ‘फॅशन शास्त्र 2022’च्या मोफत प्रवेशिकांसाठी ७७७००७०१०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य प्रायोजक ‘मुहूर्त सेलेब्रेशन’ दालनाचे संचालक विनीत राजपाल आणि इंदिरा नगर शाखेचे समन्वयक श्रीपाद ठोंबरे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...