- शिधा पत्रिकाधारकांना पॅकेज त्वरित मिळावे - TheAnchor

Breaking

October 22, 2022

शिधा पत्रिकाधारकांना पॅकेज त्वरित मिळावे

नाशिकरोड| प्रतिनिधी |राज्य शासनाने शिधापत्रिका धारकांसाठी दिवाळीनिमित्त चार वस्तूंचे पॅकेज जाहीर केले आहे. ते सर्व शिधा पत्रिकाधारकांना लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. 
Ration-card-holders-should-get-the-package-immediately
महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोद बागुल, चंद्रकात भालेराव, देवळाली केम्प शहराध्यक्ष पंडित साळवे, दिनेश आहिरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश गायकवाड यांनी शिधा पत्रिकाधारकांना पॅकेज लवकर पुरविण्याचे आश्वासन दिले.