Skip to main content

सर्वस्पर्शी’ची नियमितता कौतुकास्पद : डॉ. चंदनशिवे

नाशिक| मराठी साहित्यविश्‍वात शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासूनची परंपरा असलेल्या दिवाळी अंकांना आजही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभतो. विशेष म्हणजे दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या अनेक संस्था मधल्या काळात बंद पडल्या असल्या, तरी नाशिकच्या तन्मय प्रकाशन सारख्या काही संस्थांतर्फे नियमितपणे दिवाळी अंक प्रकाशित केला जातो, ही निश्‍चितच गौरवास्पद बाब आहे. असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या लोक कला विभागाचे प्रमुख व लोकप्रिय गायक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी येथे केले.
Sarvasparshis-regularity-is-commendable-Chandanshive
येथील तन्मय प्रकाशनच्या ‘सर्वस्पर्शी’ दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रा. डॉ. चंदनशिवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, अंकाचे संपादक व प्रकाशक ब्रिजकुमार परिहार, बागेश्री वाद्यवृंदचे संचालक व सर्वस्पर्शीच्या संपादक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य चारूदत्त दीक्षित, तन्मय प्रकाशनचे ऑनलाईन मिडिया ‘पार्टनर दि ॲंकर न्यूज’चे संचालक दिगंबर मराठे, ज्येष्ठ कवी दत्तात्रय कोठावदे, ज्येष्ठ पत्रकार सुनील भास्कर, औरंगाबाद येथील श्री. पवार आदी व्यासपीठावर होते. श्री. दीक्षित यांनी प्रा. डॉ. चंदनशिवे यांचे स्वागत केले. श्री. मराठे यांनी प्रास्ताविक केले. 

प्रा. डॉ. चंदनशिवे म्हणाले की, सर्वस्पर्शीसारख्या दिवाळी अंकातून श्री. परिहार यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, सर्वस्पर्शी दिवाळी अंकाचे यंदा बारावे वर्ष असून, संपूर्ण राज्यभर अंकाचे सभासद आहेत. तसेच, यापुढे दिवाळी अंकाची व्याप्ती वाढवून सर्वस्पर्शी या नावानेच संस्था स्थापन करत असल्याचे व त्यासाठी मार्च २०२३पर्यंत सभासद नोंदणी सुरू असून, इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन श्री. परिहार यांनी या वेळी सांगितले. सर्व उपस्थितांना अंकाच्या प्रती भेट देण्यात आल्या.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...