Skip to main content

'कोवळे किरण- संवाद आपुलकीचा' अंतर्गत समुपदेशन शिबिर

नाशिक| सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम या शाळेत पालकांसाठी' कोवळे किरण -संवाद आपुलकीचा' या विषयावर समुपदेशनपर व्याख्यान संपन्न झाले. पालकांचे वर्तन - मुलांचे अनुकरण याविषयी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध  होमिओपॅथिक मानसोपचारतज्ञ डॉ. वृषिनीत सौदागर यांनी  व्याख्यानातून मुलांच्या मानसिक शारीरिक, शैक्षणिक व सामाजिक, समस्यांवर  अतिशय  हसत खेळत, सर्वंकष उदाहरणे देऊन सोप्या, पटेल, रुचेल अशा शब्दांमध्ये प्रभावीपणे  समुपदेशन केले. 
Kovale-Kiran-Samvad-Apulakicha-Internal-Counseling-Camp
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला, संस्थेचे पालक नितीनजी गर्गे यांनी प्रास्ताविकामध्ये पालकांशी पाल्याच्या हिताविषयी संवाद साधला. प्रमुख वक्ते डॉ. वृषिनीत सौदागर यांनी चित्रफितीद्वारे  'पालकांचे वर्तन - मुलांचे अनुकरण' या मुद्द्यावर भर दिला. मुलांचे मातीशी नाते जुळू द्या तरच त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल  हे सांगतानाच व्यवहारातील उदाहरणे देऊन मानसिक शक्ती वाढावी म्हणून मुलांना अध्यात्माकडे वळवा , पाल्यांशी सुसंवाद साधा हे  स्पष्ट केले . मानसिक आरोग्य सर्वात महत्त्वाचे असून ते नसेल तर मधुमेह, सोरायसिस, लठ्ठपणा इ. आजार उद्भवतात, त्याचमुळे प्रतिकारशक्ती, आयुर्मर्यादा कमी होत चाललेली आहे असे सांगितले. आठवड्यातून एक दिवस   पालकांनी देखील मोबाईल शिवाय व्यतीत करावा आणि स्वतःला व  मुलांना  ह्या आभासी विश्वापासून दूर ठेवून वर्तनातील बदलाचे निरीक्षण करावे असे सांगितले. कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तर सदरात  अनेक पालकांनी प्रश्न विचारले आणि समस्यां चे निराकरण करून घेतले.
 
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्रद्धा घोलप यांनी केले. परिचय सुपरवायझर प्रियांका भट यांनी करून दिला तसेच आभार मनीषा बॅंडकुळे यांनी मानले. मुख्याध्यापिका डॉ.अंजली सक्सेना , उपमुख्याध्यापिका जयसुधा नायडू  पर्यवेक्षिका प्रियांका भट यांच्या मार्गदर्शनाखाली   तसेच शिक्षक  आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमासाठी मोठया संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...