नवी दिल्ली |कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य कुटुंब कल्याण विभागाने चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी त्या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वरील देशातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 1 जानेवारी 2023 पासून हवाई सुविधा पोर्टलवर कोविड नकारात्मक RTPCR चाचणी अहवाल अपलोड करणे आवश्यक करण्यात आहे. भारताचा प्रवास सुरू केल्यापासून 72 तासांच्या आत चाचणी घेण्यात यावी असे स्पट करण्यात आले आहे.