मुंबई| पंतप्रधानांच्या मातोश्री श्रीमतीहीराबेन मोदी (वय१००) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली गांधीनगर येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्यानिधनानंतर आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"एका समर्पित शतायुषी जीवनाचा ईश्वरच रणी शानदार विराम..., एक तपस्वी जीव नयात्रा, निष्काम कर्मयोगाचे प्रतीक आणिमूल्यांवरील अचल निष्ठा यांना हे जीवन समर्पित झाले होते.
मी जेव्हा त्यांना 100 व्या वाढदिवसाच्या दिवशी भेटलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट मलासांगितली, जी नेहमी माझ्या स्मरणात राहील,' कार्य करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धिने' म्हणजे प्रत्येक कार्य शहाणीवतेने केले पाहिजे आणि जीवन विशुद्धतेने जगले पाहिजे"