- नाशकात रिलायन्स जिओची 5G सेवा देण्याची घोषणा - TheAnchor

Breaking

December 29, 2022

नाशकात रिलायन्स जिओची 5G सेवा देण्याची घोषणा

नाशिक|प्रतिनिधी| नाशकात रिलायन्स जिओतर्फे ट्रू 5G सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये 5G सेवा सुरू करणारी रिलायन्स जिओ ही पहिली आणि एकमेव ऑपरेटर कंपनी ठरली आहे. आता जिओ वापरकर्ते 1 GBPS+ पर्यंतच्या स्पीडसह अमर्यादित 5G डेटाचा आनंद कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय घेऊ शकणार आहे.
Reliance-Jio-Announces-5G-Service-in-Nashik
जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या/ कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल असे सांगण्यात आले आहे.