Skip to main content

सोन्याचे दर भिडले गगनाला; सोने 61 हजारी

नाशिक| जागतिक बँकिंग संकटाचा परिणाम आता  सोन्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. याबाबत ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सोने 61 हजारांच्या जवळ पोहोचले आहे, अशी माहिती दिली आहे. 
Gold-prices-skyrocketed-Gold-rate-per-ten-gram-61-thousand
सोन्याच्या दरवाढ आणि एकूण परिस्थितीबाबत अरोरा म्हणाले की, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 12:40 वाजता, किंमत प्रति 10 ग्रॅम 60,100 वर गेली आहे.  त्याचवेळी, आरटीजीएस (बिल आणि जीएसटी) दर 61,700 वर गेला आहे. 2023/24 मध्ये, MCX वर सोन्याचा भाव 62,500 ते 67,500 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.  यूएस मधील व्याजदर 2023 च्या उत्तरार्धात किंवा 2024 च्या सुरुवातीस कमी होण्यास सुरुवात होईल.  असे झाल्यास सोन्याचे भाव वाढतील.  22 मार्च रोजी, फेडरल बँक व्याज वाढवायचे की कमी करायचे याचा निर्णय घेईल.  व्याज वाढल्यास सोन्याच्या किमतीवर दबाव येईल. सोने-चांदी खरेदीसाठी ही चांगली वेळ असेल.  व्याजदर कमी झाल्यास सोने आणि चांदी वाढेल असे अरोरा म्हणाले.

जर MCX वर चांदीचा 72/73/74 हजार रुपये प्रति किलोचा मागील उच्चांक तोडला आणि येत्या काही महिन्यांत तो थांबला तर 2024 मध्ये ही किंमत 90 हजार ते 1 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. 2011 मध्ये आर्थिक संकट आले. तेव्हा चांदीचा भाव 73 ते 74 हजार रुपये प्रतिकिलो झाला होता. तेव्हापासून चांदीने ५ वेळा उच्चांक मोडण्याचा प्रयत्न केला आहे. व्याजदर कमी झाल्यास 74 हजार रुपये प्रतिकिलोच्या भावाला ब्रेक लागू शकतो, असे तज्ज्ञांचे ही मत आहे असे, नाशिक ऑल इंडिया ज्वेलरी अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे मेहुल थोरात यांनी सांगितले आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...