Skip to main content

युवकांनी नोकरी सोबतच व्यवसायातही उतरावे: ना. चंद्रकांत पाटील

नाशिकरोड|प्रतिनिधी| देशातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, असा प्रयत्न दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा होता. त्यासाठी युवकांनी नोकरीच्या बरोबरीने व्यवसायात उतरले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. युवकांचा कौशल्य विकास, त्यांच्या संस्थेसाठी कर्ज आणि संस्थेत निर्माण होणा-या वस्तूला बाजारपेठ असा वाजपेयींचा दृष्टीकोन होता. त्यातूनच १९९८ साली राष्ट्रीय स्तरावर एनवायसीएस संस्था सुरु झाली. या संस्थेला सर्व ती मदत करू, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
Youth-should-enter-business-along-with-job-minister-Chandrakant-Patil
नवी दिल्लीतील नॅशनल युवा को-ऑपरेटीव्ह सोसायटीची (एनवायसीएस) देशातील ३४ वी शाखा जेलरोड येथे सुरु झाली. तिचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव,  आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे,  माजी आमदार बाळासाहेब सानप,  नाशिक रोड व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, व्ही. एन. नाईकचे सरचिटणीस हेमंत धात्रक,  उध्दव निमसे, विजय साने, महेश दाबक, सुनिल आडके, शांताराम घंटे, महाव्यस्थापक  आर. डी. कुलकर्णी, प्रतिम आढाव, गिरीष पालवे, सुनिल बच्छाव  हे व्यासपीठावर होते.

आमदार राहुल ढिकले म्हणाले की, चांगले काम करायचे असेल तर सर्वजण पाठिंबा देतात, हे नाशिक रोडचे वैशिष्ट्य आहे. संस्था वाचली तर सहकार चळवळ वाचेल. सहकारी संस्था कोणती, त्यापेक्षा ती कोण चालवते यावर विश्वासर्हता अवलंबून असते. सहकाराला घर घर लागून स्वाहाकार वाढला आहे. त्यामुळे २५ टक्के सहकारी बॅँका बंद पडल्या आहेत. मात्र, नरेंद्र मोदींनी अमित शहांना सहकार मंत्री केल्यानंतर देशातील चित्र बदलत आहे. महाराष्ट्रातील सहकाराचे चित्र सुधारायचे असेल तर शहांसारखा हेड मास्तर गरजेचा आहे.

राजेश पांडे म्हणाले की, संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. संस्थेच्या ६२० जिल्ह्यात शाखा आहेत. ३३ राज्यात काम चालते. ३० हजार सभासद आहेत. देशभरातील सर्व युवकांना सभासद करण्याचा प्रयत्न आहे. ही पतसंस्था नसून मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्था आहे.

शाखा अध्यक्ष संजय किर्तने यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष राजेश आढाव यांनी सूत्रसंचालन केले. सचिव ज्ञानेश्वर भोर यांनी आभार मानले.

संचालक प्रमोद मुर्केवार, संचालिका प्रतिभा सोनवणे, रविद्र शिंदे, निलेश अहिरराव आदींनी संयोजन केले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...