- सोने आणि चांदी दरातील अनिश्चिततेचा काळ - TheAnchor

Breaking

August 13, 2020

सोने आणि चांदी दरातील अनिश्चिततेचा काळ

नाशिक| गेल्या पाच महिन्यांतील लॉकडाऊन काळात अनेक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट आणि रियल इस्टेट मधून आपली गुंतवणूक काढून ती कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवल्याचे दिसते. त्यातही खात्रीशीर गुंतवणूक म्हणून चांदीत मोठी गुंतवणूक केल्याचे दिसते.त्यामुळे चांदीने सर्व विक्रम मागे टाकले आहे. सध्या चांदीचे दर प्रती किलोला ७८ हजार तर सोने ५८ हजारांपर्यंत पोहचले आहे, मात्र २४ तासात चांदीत १० हजार तर सोने दरात ५ हजाराने घसरण झाल्याने सध्या दरात अनिश्चितता दिसत आहे.

A-period-of-uncertainty-in-gold-and-silver-prices
काही सराफी क्षेत्रातील जाणकारांच्या मते जसा कालावधी जाईल आणि कोरोनावरील लस जश्या बाजारात येतील तसा सोने, चांदीच्या दरातील उतारचढ दिसत राहील असे स्पष्ट केले. फेब्रुवारीत सोने ३९००० प्रति १० ग्राम,तर चांदी ४०००० प्रति १ किलो असा होता. अचानक झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे जनतेचा विश्वास पूर्णपणे फायदेशिर गुंतवणूक म्हणून सोने, चांदीवर दिसून आली, तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर  युध्दजन्य परिस्थितीने ही त्यात भर घातली व वेगाने वाढले ऑगस्टमध्ये सोने ५८००० प्रति १०  ग्राम तर चांदी ७८०००  प्रति१ किलो प्रयत्न पोहचले.

सणासुदीचा काळात पुन्हा भाव वाढू शकतो 

कोरोनावरील लस तयार झाली आहे ही बातमी जशी जगात पसरली तशी गुंतवणूकदारांनी फायदा उचलण्याचा प्रयत्न करत सोने विक्री केल्यामुळे एका दिवसात सोने दर ५ हजार प्रति ग्राम तरच चांदी १० हजार प्रति किलो गडगडली, तर बाजारभाव ५३,५०० रु.  प्रति १० ग्रामवर स्थिरावले असून पुन्हा चीन व भारत सीमेवरील युध्दजन्य परिस्थिती व पुढील येणाऱ्या सणासुदीचा काळ लक्षात घेता  भाव परत वाढतील अशी अपेक्षा इतर अभ्यासकांनी ही व्यक्त केली आहे.

                     मेहुल  थोरात

 संस्थापक सदस्य

 महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख 

 सीएआयटी-एआयजेजीएफ

 नाशिक सराफ असोसिएशन, उपाध्यक्ष