नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकालावधीत विविध कामकाजाच्या ठिकाणी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल पोलीस दलातील सन्मानचिन्ह तसेच सर्वोच्च सन्मानाचे राष्ट्रपती पदक घोषीत करण्यात आले आहे. शहर गुन्हे शाखेचे सहा.पोलीस आयुक्त समीर शेख यांना अंबड पोलीस ठाण्यातील मुथूट फायनान्स दरोड्याच्या गुन्हयात उत्कृष्ट तपासासाठी (सन 2020) गृह मंत्रालयाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
तसेच डॉ . सिताराम काल्हे हे 1992 मध्ये एम.पी.एस.सी. द्वारे पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर त्याची प्रथम अमरावती येथे पोस्टींग झाली, त्यानंतर नागपूर, जळगांव, नंदुरबार, नाशिक ग्रामिण, सी.आय.डी. विशेष सुरक्षा विभाग व सध्या नाशिक शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यभार सांभाळत असून पोलीस खात्यातील 28 वर्षाच्या सेवा कालावधीत त्यांना सुमारे 600 बक्षिसे 85 प्रशंसापत्रे मिळाले आहे. सेवाकालावधीत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि गुणवत्तापुर्ण सेवेसाठी 15 ऑगस्ट 2020 साठी राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे.
पोलीस निरीक्षक श्री संजय चांगदेवराव सांगळे यांनी गडचिरोली येथे नेमणुकीस असतांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर सेवेबदल त्यांना पोलीस पदक ( आतंरीक सेवा पदक ) जाहिर करण्यात आले आहे. पोलीस उप निरीक्षक श्री विजय पोपटराव लोंढे हे सन 1885 मध्ये पोलीस दलात भरती झाले असुन त्यांच्या विशेष उल्लेखनीय कामकाजामुळे सन 2008 मध्ये गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त केले आहे. त्यांचे पोलीस खात्यातील 33 वर्षे सेवा कालावधीत केलेल्या कामकाजामुळे वेळोवेळी बक्षिसे व प्रशंसापत्रे मिळाली असुन आतापर्यंतच्या विशेष कार्याबद्दल आणि उल्लेखनिय सेवेबदल त्यांना 15 ऑगस्ट 2020 स्वातंत्रदिनी राष्ट्रपती पदक घोषीत झाले आहे.
पोलीस उपनिरीक्षक श्री दानिश निसाक मन्सुरी यांनी गडचिरोली येथे नेमणुकीस असतांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर सेवेबदल त्यांना पोलीस पदक ( आतरीक सेवा पदक ) जाहिर करण्यात आले आहे. सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री नितिन लक्ष्मण चंद्रात्रे यांनी पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना मा.पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह घोषीत झाले आहे. सहा.पोलीस उप निरीक्षक श्री पांडुरंग बाबुराव कावळे यांनी सेवाकालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामकाजामुळे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी 15 ऑगस्ट 2020 स्वातंत्रदिनी राष्ट्रपती पदक घोषीत झाले आहे. पोना / 859 श्री श्रीधर वाल्मीक बाविस्कर यांनी गडचिरोली येथे नेमणुकीस असताना नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर सेवेबदल त्यांना पोलीस पदक ( आतरीक सेवा पदक ) जाहिर करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयातील वरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरीलप्रमाणे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली आहेत. सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!