नाशिक|मिशन झिरो नाशिक अंतर्गत प्रभाग क्र.६ मध्ये १० ते १२ ऑगस्ट दरम्यान सलग तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या रॅपिड अॅंटिजन कोरोना चाचणीत १७४ पैकी १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना त्वरित महापालिकेच्या रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आल्याची माहिती पंचवटी प्रभागाच्या सभापती सौ.सुनिता पिंगळे यांनी दिली.
नाशकातून कोरोनाला हद्दपार करण्याचा चंग महानगरपालिकेने तसेच प्रत्येक प्रभागातील नागरसेवकांनी बांधला असून त्या अनुषंगानेच ठिकठिकाणी कोरोना तपासणी शिबिरे भरवून पॉझिटिव्ह रुग्ण हुड़कून काढण्यात येत आहे.आणि विशेष म्हणजे नागरिकही या त्यास चांगला प्रतिसाद देत असून त्यामुळेच पॉझिटिव्ह रुग्ण शोधणे सोपे जात आहे,असेही सभापती सौ.पिंगळे म्हणाल्या.प्रभाग ६ मधील कोरोना तपासणी शिबिर तसेच आतापर्यंत या कार्यात ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली ते डॉक्टर्स व परिचारिका याचाही सौ. पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक पुंडलिक खोड़े,पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड,संजय फड़ोळ,गोकुळ काकड़,प्रमोद पालवे, डॉ. देवकर, ज्ञानेश्वर पिंगळे, राजेश पिंगळे, प्रेम मंडोटिया आदीं उपस्थित होते.
प्रभागातून कोरोनाचे संमूळ उच्चाटन होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून अशा प्रकारची तपासणी शिबिरे यापुढेही नित्यनियमाने भरविली जातील. प्रभागातील नागरिकांनी घाबरून न जाता आपापली तपासणी करून घेऊन महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहनही सभापती सौ.सुनिता पिंगळे यांनी केले. पंचवटी प्रभाग सभापती या नात्याने आपण संपूर्ण पंचवटी परिसर म्हणजे पंचवटी,मेरी,म्हसरुळ, आडगाव, मखमलाबाद, नांदुर आदी परिसरात निर्जंतुकीकरण करून घेतले. तसेच सर्वत्र आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप केले. तसेच मायको दवाखानाआणि मेरी कोविड सेंटरला वेळोवेळी भेटी देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले, असेही सौ पिंगळे पुढे म्हणाल्या.