- लॉकडाऊन हवं की नको? मनसेचा ९ प्रश्नांद्वारे ऑनलाइन सर्वे - TheAnchor

Breaking

August 12, 2020

लॉकडाऊन हवं की नको? मनसेचा ९ प्रश्नांद्वारे ऑनलाइन सर्वे

नाशिक|अँकर वृतसेवा| लॉक डाऊनला आता ५ महिने होत आहे, अजून ही टाळेबंदी संपण्याचे चिन्हे नाही, याकाळात जनतेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे हा लॉकडाऊन ठेवायचा की संपवायचा याबाबत जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न मनसे करत असून त्यासाठी गूगल फॉर्मची लिंक देण्यात आली आहे. वेळ काढून आपण आपली मते भावना काय आहेत त्यात जाऊन नोंदवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.
Lock-down-or-not-MNS-online-survey-with-9-questions
नागरिकांना या फॉर्म मध्ये ९ प्रश्न विचारण्यात आली आहे. लॉकडाऊन संपुष्टात आणला पाहिजे का, आपल्या नोकरीवर नकारात्मक परिणाम झाला का, वैद्यकीय मदत होते का, रेल्वे सेवा, एस टी सेवा पूर्ववत सुरू झाली पाहिजे का यासह इतर प्रश्नांचा समावेश आहे. जनतेला १८ ऑगस्ट २०२० सायंकाळी ७ वाजेपर्यंत गूगल फॉर्म लिंकवर आपली मते मांडायची आहेत. हा सर्वे झाल्यावर तो शासनाला पाठविला जाणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले आहे.

गूगल फॉर्म लिंक पुढीलप्रमाणे
https://bit.ly/2PJI2Cn