नाशिक| नाशिक-पुणे रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात 15 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.भगवान वीर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक श्रीमती प्राची वाजे, सहाय्यक संचालक (लेखा) दिपक बिरारी, लेखाधिकारी श्री.विनोद खैरनार, सहाय्यक लेखाधिकारी नंदू बेंडकुळे, पोलीस निरीक्षक नंदलाल पाटील, समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री.राजेंद्र कांबळे, नाशिक विभागीय अध्यक्ष श्री.राजेंद्र देवरे, जनसंपर्क अधिकारी श्री.सुरेश पाटील, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती मनिषा गांगुर्डे, गृहप्रमुख सुनिता गवारे, वरिष्ठ लिपिक महेंद्र होर्शिळ, धीरज बहिरम, अंबरनाथ कुमावत, संजय गायकवाड, भाऊसाहेब भालेराव, सुमित पगारे, सुदाम पाळदे, बाळू भालेराव, एम.एन.सैय्यद तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.