- झेडपीत महिला आणि बाल विकास भवन कार्यान्वित - TheAnchor

Breaking

August 15, 2020

झेडपीत महिला आणि बाल विकास भवन कार्यान्वित

नाशिक|  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत जिल्हास्तरीय महिला आणि बाल विकास भवनाचा शुभारंभ नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष ना.श्री बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते  झाला. 
Zilla-Parishad-Mahila-Bal-Vikas-Bhavan-operational
महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची कार्यालयं एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन नागरीकांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचे सचिव आय.ए.कुंदन यांच्या  निर्देशानुसार  नाशिक झेडपीत महिला बाल विकास भवन सुरू करण्यात आले.
याप्रसंगी नाशिक जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती आर्कि.अश्विनीताई आहेर, झेडपीच्या सीईओ लीना बनसोड, अति.मु.का.अ. रविंद्र शिंदे,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री महेश बच्छाव, महिला व बालविकास अधिकारी श्री दीपक गोविंदराव चाटे, उप- मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद पिंगळे, श्री रवींद्र परदेशी, श्री इशाधिंन शेलकांदे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर आदी मान्यवर उपस्थितीत होते.