- गेल्या पाच महिन्यात राज्यात विक्रमी अन्नधान्य वाटप:- छगन भुजबळ : १५ ऑगस्टनिमित्त विशेष लेख           - TheAnchor

Breaking

August 12, 2020

गेल्या पाच महिन्यात राज्यात विक्रमी अन्नधान्य वाटप:- छगन भुजबळ : १५ ऑगस्टनिमित्त विशेष लेख          

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने गेल्या पाच महिन्यात विक्रमी अन्नधान्याचेवाटप केले आहे सामान्य परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३.५० लाख मे.टन धान्य वितरीत केले जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणी असूनही आहे त्याच यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३.५० लाख मे.टन मोफत तांदूळाचे वितरण. मे आणि जून पासून केशरी कार्डधारकांना देखील अतिरिक्त १.५० लक्ष मे.टन धान्य वाटप केले जात असल्याने प्रति माह जवळपास ८.५० लक्ष मे.टन म्हणजे तीनपट धान्य वितरीत करण्याचा विक्रम केला आहे.
Record-distribution-of-foodgrains-in-the-last-five-months-in-the-state-Chhagan-Bhujbal-Special-article-on-the-occasion-of-15th-August
फोटो:फाईल
माहे मार्च २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून 36 लाख 21 हजार 784 क्विंटल अन्नधान्याचे वाटप,  माहे एप्रिल २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून  36 लाख 61हजार 617 क्विंटल अन्नधान्याचे वाटप व  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ 31लाख 51हजार ,926 क्विंटल वाटप केले. 

माहे मे २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून  36 लाख ,92 हजार 164 क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ 31लाख 73 हजार 296 क्विंटल वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत डाळ 97 हजार 029 क्विंटलवाटप, एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना 8 लाख 26 हजार 381 क्विंटल अन्नधान्याचे वाटप, आत्मनिर्भर भारत योजनेमधून  मोफत तांदूळ 1 लाख ,21 हजार 166 क्विंटल वाटप. 

माहे जून २०२० मध्ये  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून  36 लाख, 54 हजार 349 क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ 32लाख, 01 हजार 066 क्विंटल  वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून    मोफत डाळ 2 लाख, 93हजार, 110 क्विंटल वाटप, एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना 4 लाख 77हजार, 665 क्विंटल अन्नधान्याचे वाटप, आत्मनिर्भर भारत योजनेमधून मोफत तांदूळ 14 हजार, 339 क्विंटल वाटप. माहे जुलै २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना एपीएल  शेतकरी योजनेमधून  37 लाख, 34 हजार 068 क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ 11 लाख 54 हजार, 112 क्विंटल वाटप. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत गहू 14 लाख 65 हजार, 087 क्विंटल वाटप करण्यात आले आहे. ऑगस्ट मध्ये हे विक्रमी अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या सुरूच आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या ३ कोटी ८ लाख एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना माहे मे पासून ऑगस्ट पर्यंत अल्पदरात धान्य. केंद्र शासनाकडून २१/- रु.किलो दराने घेतलेले गहू रु. ८/- प्रति किलो तर २२/- रु.प्रति किलो दराने घेतलेले तांदूळ १२/- रुपये प्रति किलो या दराने वितरीत. प्रतिमाह प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ तसेच प्रति कुटुंब एक किलो तुरडाळ किंवा चनाडाळ वितरण करण्यात येत आहे.आत्मनिर्भर योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना माहे मे पासून ऑगस्ट पर्यंत प्रति व्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण सुरू आहे. 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे रब्बी हंगामातील ज्वारी व मका या भरड धान्याची हमी भावामध्ये खरेदी. या योजनेचे उद्दिष्टे २.५० लाख क्विंटल वरून ९ लाख क्विंटल वाढवण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून २.५० लाख क्विंटल अतिरिक्त उद्दिष्ट वाढवून योजनेच्या मुदतीत दि. ३१ जुलै पर्यंत वाढ केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली रब्बी पणन हंगामात गहू या पिकासाठी राज्यात प्रथमच विकेंद्रित खरेदी योजना राबविण्यात आली. 

शिवभोजन योजना

दि. 26 जानेवारीपासून मा.मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबई मध्ये आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालय ठिकाणी पालकमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते महाविकास आघाडीच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार. दररोज एक लाख थाळी उपलब्ध करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याची सुविधा  सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेतून जवळपास दीड कोटी गरीब व गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

शब्दांकन
दत्तात्रय सुखदेव कोकरे ,
विभागीय संपर्क अधिकारी, 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई.