मुंबई| नाशिक| राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे थांबून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या प्रश्नांचे निरसन देखील केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार मंत्री ना.छगन भुजबळ हे दर मंगळवारी १० ते १२ या वेळेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहे.
![]() |
फोटो: फाईल |
त्यानुसार राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे दर मंगळवारी सकाळी १० ते १२ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय मुंबई येथे उपस्थित असणार असून राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आपल्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी तसेच भेटी घेणार आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत राष्ट्रवादी भवन येथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक देखील केली.