- नियमित प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणेच स्थगित - TheAnchor

Breaking

August 11, 2020

नियमित प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणेच स्थगित

नवीदिल्ली| पूर्वी ठरविल्याप्रमाणे आणि माहिती दिल्याप्रमाणे, नियमित प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित राहतील असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

Regular-passenger-and-suburban-train-services-suspended-as-before
फोटो:फाईल
सध्या सुरु असलेल्या 230 विशेष गाड्या सुरूच राहतील असे ही सांगितले आहे. सध्या राज्य सरकारच्या मागणीनुसार मर्यादित संख्येने चालविल्या जाणार्‍या मुंबईतील लोकल गाड्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

विशेष गाड्यांच्या वापरावर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविल्या जाऊ शकतात लॉकडाऊनपूर्वी सुरु असलेल्या सर्व नियमित आणि उपनगरीय गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे रेल्वेने कळविले आहे.

सौ. पीआयबी