टीम अँकर
हरयाणा|जयपूर-दिल्ली महामार्गवर एकत्र येऊन रविवारी १३ डिसेंबर रोजी शाहजहांपूर सीमेवरुन शेतकऱ्यांचा "दिल्ली मार्च" सुरू होईल. आज राजस्थान आणि हरियाणा येथील शेतकरी कोटपुतली आणि बेहोरमध्ये जमतील आणि त्यानंतर रविवारी सकाळी १० वाजता शांतीपूर्ण पद्धतीने शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य योगेंद्र यादव यांनी दिली.
केंद्र सरकारच्या नवीन शेती कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इरादा शेतकरी संघटनांनी व्यक्त केला. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात कोणताही तोडगा अद्याप निघाला नाही. याविषयी अधिक माहिती देतांना संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य योगेंद्र यादव म्हणाले की, आज १२ डिसेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांचा रात्री एकत्र जमण्याचा निर्णय झाला होता, आज कुठलेही आंदोलन नव्हते असे सांगून रविवारी दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता सर्व आंदोलक जयपूर- दिल्लीकडे कूच करणार आहे.
यात महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात बिहार आदी राज्यातून शेतकरी नेते मोठया संख्येनं येणार आहे. दिल्लीकडे येणाऱ्या सीमा यापूर्वीच आंदोलकांनी बंद केल्या आहेत. सोनीपत, पश्चिम कडून टिकरी, उत्तरप्रदेश येथील गाझियापूर, सिंघु आदी सीमांवर शेतकरी आंदोलक उपस्थित आहेत. दक्षिण सीमेवर आंदोलक जमतील. आतापर्यंत आमचे आंदोलन शांततेने आणि लोकशाही मार्गाने झाले आहे आता ही आमचा दिल्ली मार्च शांतीपूर्ण मार्गाने असेल असे त्यांनी सांगितले.