नाशिक| शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता व संशोधन वाढीसाठी महाविद्यालयांनी मूल्यमापनासाठी निर्देशित केलेल्या कार्यपध्दतीची अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले.
वैद्यकीय विद्याशाखेकरीता विद्यापीठातर्फे ’सिम्पोसियम ऑन असेसमेंट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑन द बेसिक ऑफ नॅक पॅरामिटरर्स’ विषयावरील कार्यशाळेत अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वाय.एम. जयराज, लोणी येथील प्रवरा इन्स्टीटयुट ऑफ मेडिकल सायन्सेसचे समन्वयक, एम्स नागपूरचे मा. सदस्य डॉ. सिध्दार्थ दुभाषी, तुतीकोरीनचे व्हि.ओ. चिदंबरनार कॉलेजचे प्राध्यापक डॉ. राजा डी. पेचुमिथू आदी मान्यवर ऑनलाईन कार्यशाळेस उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंबी विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता व संशोधन वाढीसाठी ’नॅक’ निर्देशित केलेल्या मापदंडाचा अवलंब करावा. महाविद्यालयांकरीता तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केल्यास मुलभूत प्रक्रिया व कार्यपध्दतीत महाविद्यालयांना अडचणी येणार नाहीत. गुणवत्ता व संशोधनवाढीसाठी पायाभूत बाबींचा पूर्तता होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठाच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये संशोधनावर भर देण्यात आला आहे. शिक्षण प्रणालीचा जागतिक स्तरावर विस्तार करणेसाठी महाविद्यालयांनी ठरवून दिलेले नियम व निर्देश यांचे काटेकोर पालन करावे जेणेकरुन मूल्यांकन प्रक्रिया सोपी होईल असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या प्रारंभी मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी कार्यशाळा महत्वपूर्ण असून अद्ययावत ज्ञानाचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे. याकरीता सर्व महाविद्यालयांनी विद्यापीठाने निर्देशित केलेल्या कार्यपध्दतीचा व नियमावीलचा वापर करावा. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तंत्रज्ञान व त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन प्रभावी ठरते. यासाठी वेळोवेळी कार्यशाळा, चर्चासत्रांत सहभाग घेऊन सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि कार्याचे योग्य मुल्यमापन करावे असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेतडॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वाय.एम. जयराज यांनी करिकुलम अस्पेक्ट व टीचींग लर्निंग अॅण्ड इव्हॅल्युएशन विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण गरजेचे आहे. याकरीता विविध ई-कोर्सेसचा अवलंब करावा. क्वालिटी मॅनेजमेंट करीता मार्गदर्शक तत्वांचा वापर, स्टॅडर्ड परफॉमन्स अॅण्ड लर्निंग आऊटकम, शैक्षणिक सबलीकरणाकरीता गुणवत्ता कार्याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. याकरीता आवश्यक घटक, संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्य व त्यावर परिणाम करणारे घटक आदींची माहिती त्यांनी दिली.
कार्यशाळेत एम्स नागपूरचे मा. सदस्य डॉ. सिध्दार्थ दुभाषी यांनी स्टुडन्ट सपोर्ट अॅण्ड प्रोग्रेशन, गव्हनर्स लिडरशिप अॅण्ड मॅनेजमेंट विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरीता विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यामध्ये त्याचा शिक्षणासह समाजोपयोगी व सांस्कृतिक कामात ओढ निर्माण होईल. महाविद्यालयस्तरावर राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. आदी उपक्रमांच्या माध्यमातून व्यक्तीमत्वाची घडण करणे शक्य आहे. महाविद्यालयात मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी फॅकल्टी प्रोग्राम, चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन आवश्यक आहे. महाविद्यालयात ई-ग्रंथालयाचा वापर, अद्ययावत माहितीकरीता इंटरनेट व सॉफ्टवेअरचा वापर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तुतीकोरीनचे येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजा डी. पेचुमिथू यांनी इन्स्टिटयुशनल व्हॅल्यू अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीस विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, पर्यावरण रक्षणासाठी सर्वांचा सहभाग असणे गरजचे आहे. यासाठी बायोगॅस, सौरउर्जा, पवनउर्जा आदी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते वापरण्यायोग्य करावे जेणेकरुन पाण्याचा अपव्यय होणार नाही. विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण गरजेचे आहे. आजच्या तंत्राज्ञानाच्या काळात सर्वांनी पर्यावरणस्नेही रहावे. आपली संस्कृती आणि आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
‘स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष’ उपक्रमातंर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होतेे. या कार्यशाळेचे समन्वयन वैद्यकीय विद्याशाखेच अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे यांनी केले. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. डॉ. प्रत्युष काबरा यांनी परिचय करून दिला. या कार्यशाळेचे आयोजन उपकुलसचिव डॉ. नितीन कावेडे यांनी केले. श्री. सचिन धेंडे, श्री. दिप्तेश केदारे यांनी तांत्रिक सहाय्य केले. वैद्यकीय शाखेकरीता आयोजित कार्यशाळेस विद्यापीठाचे विविध संलग्तिन महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राचार्य, अभ्यांगत व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.