नाशिकरोड|प्रतिनिधी ना |ना शिकरोड ते व्दारका रस्त्यावरील प्राचीन वृक्ष हटविण्याचे काम सुरु झाले आहे. दत्तमंदिर, उपनगर नाका, गांधीनगर येथे वाहतुकीला अडथळा ठरणारी २४ झाडे तोडण्यास महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे वाहतूक वेगाने व सुरक्षित होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. वाहतूक कोंडी व अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नंतर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तोडण्यात येणा-या जुन्या वृक्षांच्या बदल्यात देशी झाडे लाऊन ती वाढवावीत, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले की, व्दारका ते नाशिकरोड या साडेसहा किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण नव्हे तर मजबूतीकरण होणार आहे. अकरा महिन्यांची मुदत या कामासाठी असली तरी १५ मे पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण खर्च १९.४२ कोटी खर्च येणार आहे. यामध्ये रस्ता मजबूतीकरण, डांबरीकरण, गतीरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजकांना रंगरंगोटी व ग्रील दुरुस्ती, धोकादायक झाडांना रेडियम लावणे आदींचा समावेश आहे. या मार्गावरील २४ झांडापैकी १५ तोडली जाणार असून नऊ झाडांचे पुनर्र...