नाशिक| मधुरा वुमन एम्पॉवरमेंट अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट (मधुरा ट्रस्ट) या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या उत्तर महाराष्ट्रातील दोन अग्रगण्य शिक्षण संस्थांच्या कोषाध्यक्षा स्मिता प्रशांत हिरे यांनी समाजसेवा तसेच शिक्षणक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिर्व्हसिटी, किंगडम ऑफ टोंगा या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी.एच.डी.) या पदवीने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथील हॉटेल रॅडिसन, गुरूग्राम येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास यूनिर्व्हसिटीचे प्रो वाईस चांसलर (आशिया) डॉ रिपु रंजन सिन्हा, सेंटर फॉर एज्युकेशन डेव्हलपमेंट डॉ प्रियदर्शी नायक, डॉ राकेश मित्तल उपस्थित होते. हिरे घराण्याचा समाजसेवेचा वारसा तसाच पुढे चालविणार्या : “हजार डोळ्यांमधील पाणी माझ्या डोळ्यांमध्ये जमते, हजार हृदये गहिवरती तर मन माझेही गहिवरते, असे हजारासंगे आहे जडलेले माझे नाते”, या ओळींना सार्थ करत स्मिता हिरे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचेकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा तेवढ्याच तळमळीने पुढे नेत उत्तर महाराष्ट्राच्या मानव विकासात महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार्या आणि शिक्षणापासून वंचित राहणार्या समाजातील तळागाळातील गरीब, आदिवासी मुलांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणून आपल्या समाजाचे जबाबदार नागरीक घडविण्यात मोलाची भूमिका पार पाडणार्या महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या शिक्षण संस्थांचे कोषाध्यक्षा पदाची जबाबदारी तेवढ्याच समर्थपणे सांभाळीत आहेत. तसेच मधुरा वुमन एम्पॉवरमेंट अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट (मधुरा ट्रस्ट) या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा म्हणून कार्यरत करीत असतांना महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी त्या अखंड प्रयत्नरत आहेत.