- ओझर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - TheAnchor

Breaking

January 18, 2021

ओझर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

ओझर| प्रतिनिधी|येथील एचएएल समोरील  मुंबई आग्रा महामार्गवर अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. एचएएल कंपनी मधील सबस्टेशन १३२ केव्हीमधून येऊन महामार्ग ओलांडून जात असताना अज्ञात वाहनाने बिबटयाच्या तोंडाला जबर धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. 
Leopard-killed-in-Ozar-collision-leford-accident
Photo:File
साधारण १ वर्ष वयाची मादी बिबट असल्याचे चांदवड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांनी सांगितले आहे. वन्यप्राणी बिबटया हा वन्यजीव अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मधील प्राणी आहे. या घटनेचा पंचनामा करून मृत बिबट्याला उत्तरीय तपासणी साठी चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे पाठविण्यात आले.

यावेळी वडनेरभैरव वनपरिमंडळ अधिकारी देविदास चौधरी, वनरक्षक विजय टेकणार, वनमजुर वसंत देवरे, वाहनचालक शिंदे, वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर व अनंत वाळे, महामार्ग पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम, हवालदार सतीश पवार, हवा.अंकुश गोधडे, किरण मुरडणर, आदीनी सहकार्य केले.