नाशिकरोड| नाशिककरांसाठी भूषणावह रामलीला हिंदी नाटिका रंगीत तालमीला गांधीनगर मध्ये उत्साहात प्रारंभ झाला. रामायणातील विविध मुख्य प्रसंग, संवाद यावर गांधीनगर प्रेस कर्मचाऱ्यांतर्फे नियमित सराव केला जातोय. ६७ वर्षांची प्रदीर्घ गौरवशाली परंपरा लाभलेल्या गांधीनगर रामलीला समस्त रामभक्तांसाठी पर्वणीच ठरते. यातील बहुसंख्य कलावंत प्रेस मधील कर्मचारी आहेत, हे विशेष. रामायणातील विविध मुख्य प्रसंगाची रंगीत तालीम झाली. रत्नाकर डाकू - नारद मुनी भेट, रावण अत्याचार, श्रावण वध, राम लक्ष्मण सीता जन्म, सीता स्वयंवर, मंथरा कैकयी संवाद, वनप्रस्थान व ईतरही मुख्य प्रसंग यांची रंगीत तालीम घेण्यात आली. रामाची भूमिका महेश खैरनार, लक्ष्मण - प्रदीप भुजबळ, सीता - प्रिया सुरते, दशरथ - संजय महाले, परशुराम - हरीश परदेशी, कैकयी - रचना चिंतावर, भरत - गोपाल लोखंडे, रावण - ज्ञानेश्वर कुंडारिया, विभिषण - सतीश वाणी, अंगद - शुभम परदेशी, वाली - चेतन धराडे, सुग्रीव - निशांत हुंमणे, हनुमान - संजू रासकर, नारद मुनी - मुकुंद वैद्य, शत्रुघ्न - अनिल गायकवाड, वाल्मिकी - सुनील मोदियानी, जनक - रवि वरखेडे, वशिष्ठ - सचिन दलाल...