नाशिक| प्रतिनिधी| सणासुदीच्या काळात धान्य तसेच दिपावलीसाठी साखर, तेल, रवा, चनादाळ लवकर उपलब्ध करून दयावे अशी विनंती केली. नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी दुकानदारांना येणाऱ्या अडी अडचणीबाबत व सणासुदीच्या काळात धान्य लवकर आणि मोजून मिळावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी राज्याध्यक्ष गणपत डोळसे पाटील, जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, शहराध्यक्ष फारूख हुसेन शेख, महिला अध्यक्षा अरुणाताई चव्हाण, महिला शहराध्यक्षा गौरीताई आहेर व पदाधिकारी लता वालझाडे, संजीवनी म्हैसफुके, संगीता आहिरराव, चित्रा काळे, सारीका बरसाले, सोनीया व्यावहारे आदी उपस्थित होते.