- दिव्य दृष्टी आय केअर क्लिनिकचा शुभारंभ - TheAnchor

Breaking

October 10, 2022

दिव्य दृष्टी आय केअर क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक|प्रतिनिधी|दिव्य दृष्टी आय केअर क्लिनिकचा शुभारंभ  रेशन दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. निवृती महाराज कापसे यांच्या हस्ते झाला.
inogration-ceremoney-of-Divya-Drishti-Eye-Care-Clinic
गिरणारे येथील गणपती मंदिरासमोरील बाजारलेन येथे रविवार कार्यक्रम संपन्न झाला. डाॅ. शुभम जाधव यांनी परिसरातील गोरगरीबांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले काम करुन गरजूंना चांगली दृष्टी देण्यासाठी प्रयत्न करावे, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे ह.भ.प निवृत्ती महाराज कापसे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे आ. हिरामण खोसकर, आ. राहुल ढिकले, आ. बबनराव घोलप यांनी ही मार्गदर्शन केले. वारकरी महामंडळाचे नाशिक जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अण्णासाहेब आहेर यांनी मनोगत व्यक्त करतांना डॉक्टर दृष्टी देतात तर अध्यत्म दृष्टीकोन असे प्रतिपादन केले.

डॉ. प्रशांत बिर्ला यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. शुभम जाधव यांना शुभेच्छा दिल्या. अँड.बाळासाहेब आडके यांनी सूत्रसंचलन करून अभार मानले. अँड. शाम तावरे, अँड. शरदचंद्र आडके मुंबई हायकोर्ट, डाॅ. प्रशांत बिर्ला, वाळू पा. भड चिखल आबे, संदिप वाघ, अशोकराव पवार, सोमनाथ फडोळे, देविदास जाधव, नरहरी जाधव .योगेश जाधव, सौ.रंजना आडके. सौ.सिधूताई दिघे आदि मान्यवर उपस्थित होते.