नाशिक|आज शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आले पण यापूर्वी देखील शिवसेनेकडे मशाल हे चिन्ह होते. छगन भुजबळ हे नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आले होते.
2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि ते शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. त्यानंतर एप्रिल मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यात देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते.
1985 साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी चिन्ह होते "धगधगती मशाल" या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली आणि मशालीने इतिहास घडविला.