नाशिक| सणा सुदीच्या दिवसात शिधापत्रिका धारक यांना वाटपात कोणतीही अडचण येणार नाहीत ,तसेच दुकानदार बांधवानी शासनाच्या नियमाप्रमाणे काम करावे,अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील दिल्या आहेत. तसेच दोन वेळचा अंगठयाचा मुद्धा ही निकाली लावला.
ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज फेडरेशन पुणे संघटनेच्या पदाधिकऱ्यांची बैठक केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत झाली. तसेच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.रविंद्र चव्हाण साहेब यांची भेटून Epos मशीन 5G च्या मिळाव्यात, तसेच राज्यातील ज्यांचे परवाने अध्याप नूतनीकरण करून मिळालेले नाहीत, त्यांचे परवाने तात्काळ नूतनीकरण प्रस्ताव नूतनीकरण करण्याचे लेखी आदेश अधिकारी वर्गाला द्यावेत, तसेच वाटपाची विसंगती म्हणजे एकाच वेळी NFSC आणि PMGKYचे धान्य शिधापत्रिकाधारक देण्यासाठी अडचण नाही याबद्दल ही माहिती दिली.
तसेच डिलिशन ज्याप्रमाणे केले जात आहे, त्याचप्रमाणे ॲडिशन सुद्धा तात्काळ करून मिळावे, यासाठी जिल्हा पातळीवर Login ID वाढून मिळावे, ज्यांना ISO सर्टिफिकेट प्राप्त झालेत, त्यांना तात्काळ CSC सेंटरच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे दुकानदारांमार्फत वाटप होऊन उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाल्याचे रेशन संघटनेने कळविले आहे. यावेळी राज्यमंत्र्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी गणपतराव (बाबा) डोळसे पाटील -राज्याध्यक्ष, शंकरराव सुरोसे -ठाणे जिल्हाध्यक्ष, शांताराम पाटील -कोकण विभाग अध्यक्ष, जयराम मेहेर -उपाध्यक्ष महाराष्ट्र फेडरेशन, बाबुराव म्हमाणे-जनरल सेक्रेटरी, योगेश बत्तासे -राज्य ग्राहक परिषद,निवृत्ती महाराज कापसे -जिल्हा अध्यक्ष नाशिक, फारूखभाई शेख- नाशिक शहर अध्यक्ष, राजु रिकामे- पालघर जिल्हाध्यक्ष, अरुण बागडे इगतपुरी उपाध्यक्ष, रमेश भोईर माजी सरपंच, विवेक बेहेरे सचिव आदी उपस्थित होते.