Skip to main content

Posts

Showing posts from October, 2024

२४ ऑक्टोबरला 'राजापूरकर सराफ' दालनाचा अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांच्या हस्ते शुभारंभ

नाशिक|प्रतिनिधी|आपलाच पिढ्यान पिढ्याचा सोनार राजापूरकर सराफ यांच्या नविन दालनाचा शुभारंभ दि. २४ ऑक्टोबर रोजी अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक तक्रार आयोगाचे सेवानिवृत्त न्यायाधिश उदय सोनवणे, जागृत नाशिक जागृत भारत जागृत विश्वचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद, नाशिकचे इतिहास अभ्यासक रमेश पडवळ आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हा उद्घाटन सोहळा २४ ते २६ दरम्यान होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री सिद्धी संकुल, चांदी गणपती मंदिराच्या मागे, गायधनी गल्ली, नवीन सराफ बाजार, रविवार कारंजा येथे दालन सुरू होणार असून या दालनामुळे ग्राहकांना जवळच सोने, चांदी खरेदीची सुविधा उपलब्ध होणार आहे.  महा गुरुपुष्यमृतयोग व उद्घाटन समारंभ निमित्ताने आमच्या खास ग्राहकांसाठी जितके सोन्याचे दागिने तितकी वजनाची चांदी फ्री असून ही योजना फक्त २२ कॅरेट दागिने खरेदीवर उपलब्ध आहे.  येथील नव्या दालनाला मोठ्या संख्येने भेट देऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजापूरकर सराफचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी केले आहे. नवीन नावासह आपल्या सोयीच्या ठिकाणी ...

भाजपकडून सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा संधी

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|भारतीय  जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली आहे. यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित यांची ही नावे यादीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील विदयमान ४ आमदारांवर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा संधी दिली आहे.  लोकसभा निकाल जून २०२४ मध्ये जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. महाराष्ट्र आणि  झारखंड राज्याची निवडणुक जाहीर झाली. महाराष्ट्रात  २० नोव्हेंबरला एकाच दिवशी मतदान होत असून, २३ नोव्हेंबरला निकाल आहे. विधानसभेची आचारसंहिता लागल्यानंतर सर्वांचेच लक्ष उमेदवारीकडे लागले होते. त्यात भारतीय जनता पक्षाने बाजी मारत आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  या यादीत नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, बागलाणमध्ये दिलीप बोरसे, चांदवडला डॉ. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चांदवडमध्य...

काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या लकी जाधव यांना उमेदवारी द्या; कार्यकर्ते नागरिकांची मागणी

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| इगतपुरी-त्र्यबकेश्वर मतदार संघातून गेल्या ३ टर्म पासून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे काँगेसशी एकनिष्ठ असलेल्या आणि राज्यातील १० लाख आदिवासी बांधवांचे पाठबळ असलेल्या लकी जाधव यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्ते, मतदारांकडून पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.  लकी जाधव याना तिकीट मिळाल्यास नक्कीच १  लाखाच्या लिडने निवडून येतील असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. तिकीट नाकारल्यास काँग्रेसचा उमेदवार पुन्हा निवडून येईल याची शाश्वती कमी कमी आहे.  जाधव यांना तिकीट नाकारल्यास  राज्यातील १० लाखाच्या आसपास आदिवासी वोट बँकेला मुकावे लागेल अशी चर्चा आहे. त्यामुळे जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी मतदार संघासह राज्यातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यापाठोपाठ राज्यातही काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, राज्यातही लकी जाधव यांचं संघटन मजबूत  असून राज्यातील आदिवासी समाज त्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे जाधव यांना उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहेत.

२४ ऑक्टोबरला मार्जिन वाढीवर निघणार तोडगा; शासन- धान्य दुकानदार, शॉप किपर्स फेडरेशनची बैठक

नाशिक| राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन वाढ या प्रमुख मागणीसह प्रलंबित इतर न्याय हक्काच्या मागण्यांबाबत अन्न पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत स्वस्त धान्य दुकानदार संघटना आणि शॉपकिपर्स फेडरेशनच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची दि. २४. ऑक्टोबर रोजी दुपारी ०४ वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे यांनी दि. ५ ऑक्टोबर २०२४ तर पुणे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन यांनी दि. ३ ऑक्टोबरला राज्य शासनाला निवेदन दिले होते. शासनाने त्यानिवेदनाची दखल घेतली आहे. यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार आणि शॉपकिपर्स फेडरेशनच्या ५ पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुबई मंत्रालयात बोलावल्याचे नमूद करण्यात आले आहे. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन यांनी १० ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुरवठा मंत्री, पुरवठा सचिव यांना मागण्यांबाबत लेखी कळविले होते. त्याप्रमाणे तोडगा न निघाल्यास १ नोव्हेंबर पासून धान्य न उचलण्याचा निर्णय ...

सोने @७९ हजारी, सोन्याची चमक आणखी वाढणार!

नाशिक| सणासुदीचा काळ असल्याने सोन्याची चमक आणखी वाढली असून सोने दर २६९४ ते २७२७ डॉलर इतका होता, म्हणजेच जीएसटीसह सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅमला ७९००० रुपयांवर जाऊन पोहचले. बुधवारी सोने जीएसटीसह ७८९०० रु. होते, म्हणजे ८००  रुपयांची वाढ झाली होतीे, तर चांदीच्या भावात किलोला बाराशे रु. वाढ झाली. येणाऱ्या काळात सोने ८५ हजाराचा टप्पा पार करेल, असे मत सराफा व्यावसायिकांतर्फे  व्यक्त करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेतील संभाव्य व्याजदर कपातीची शक्यता आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे व क्रूड ऑईलच्या कमी झालेल्या किंमती यामुळे सोन्याला मागणी वाढत आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ग्राहकांकडून पसंती दिली जातं आहे. यापूर्वी सोने दरातील चढ-उतार ही अल्प काळ होती. आता पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितले जात आहे. यापूर्वी सोन्याचे दर कमी होऊन ७५,५०० रुपये प्रती १० ग्रॅम झाले होते. आता सोने दराने पुन्हा उसळी घेत ७९,००० रुपयांपर्यंत मजल गाठली आहे.  त्यामुळे गुरूपुष्यमृत मुहूर्त आणि दिवाळी अशा एकापाठोपाठ येणाऱ्या सणामुळे सोने दरात तेजी बघायला मिळत आहे. आ...

जयदत्त होळकर: आपला माणूस, एक आश्वासक युवा नेतृत्व

जयदत्त होळकर: आपला माणूस, एक आश्वासक युवा नेतृत्व आपला सेवाभाव हाच श्वास असलेल्या आणि सामाजिक उत्थानाच्या प्रक्रियेत सातत्याने गतिमान राहणाऱ्या लासलगाव येथील होळकर कुटुंबीयांनी सामाजिक, धार्मिक, कृषी व राजकीय क्षेत्रांत आपला एक दबदबा निर्माण केलेला आहे. याच होळकर कुटुंबातील अलीकडच्या काळातील एक आश्वासक नाव म्हणजे जयदत्त सीताराम पाटील होळकर होय. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीर्घकाळ संचालक व चेअरमनपद भूषविणारे आणि शरद जोशी यांच्याबरोबर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षे शेतकरी हितासाठी सदैव झटणारे स्वर्गीय सीताराम आप्पा होळकर यांचे जयदत्त हे चिरंजीव आहेत. सीताराम आप्पांचा सहकार व शेतीविषयक असलेला जिव्हाळा जयदत्त होळकर यांची ही साथसोबत करत आला. त्यांच्या मातोश्री स्व. कुसुमताई तथा आक्कासाहेब यांच्याकडे लासलगावच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान जातो. कुसुमताई जिल्हा परिषदेसह, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या. घरामध्येच राजकीय, सामाजिकतेचे बाळकडू मिळाल्याने जयदत्त होळकर यांनाही जनसामान्यांच्या हितासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, अशी प्रेरणा मिळत गे...

राजापूरकर सराफ यांच्या नवीन दालनाचा २४ ला शुभारंभ; गुरुपुष्यमृत मुहूर्तावर ग्राहकांच्या सेवेत होणार रुजू

नाशिक|आपलाच पिढ्यान पिढ्याचा सोनार राजापूरकर सराफ यांच्या नविन दालनाचा शुभारंभ दि. २४ ऑक्टोबर रोजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होत असून आता ग्राहकांना जवळच सोने, चांदी खरेदीची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनी नव्या दालनाला भेट देऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजापुरकर सराफचे संस्थापक अध्यक्ष चेतन राजापुरकर यांनी केले आहे.  नवीन नावासह आपल्या सोयीच्या ठिकाणी २४ ऑक्टोबर या गुरुपुष्यमृत  या शुभमुहूर्तावर आम्ही आपल्या सेवेत येत आहोत पिढ्यानपिढ्यापासून विश्वास आणि गुणवत्ता यासाठी राजापुरकर सराफ प्रसिद्ध असून ग्राहकांसाठी हक्काचे दालन झाले आहे. त्यानिमित्त विविध योजनांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे, असे राजापुरकर यांनी सांगितले आहे.

बिगुल वाजलं

बिगुल वाजलं अखेर झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. दुसरीकडे झारखंडमध्ये दोन टप्प्यात १३ व २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांची धाकधुक वाढली असणार, लोकसभा निवडणुकीत जनतेने  महायुतीला दिलेल्या झटक्याने चिंतेत असलेल्या युतीला हरियाणा निकालाने कॉन्फिडन्स दिला आहे. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी अनेक योजनांचे आमिष दाखवून आमचे सरकार किती लोकाभिमुख आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा किती फायदा येणाऱ्या काळात युतीला होतो हे लवकरच स्पष्ट होईल. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असे मानले जात असतानाच तिसरी आघाडी ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पारंपरिक पक्षांची डोखेदुःखी वाढणार आहे. तिसऱ्या आघाडीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येते. २०१...

सोमवारपासून संतश्रेष्ठ सोपानदेव प्रदक्षिणा दिंडीचे आयोजन

इचि करीता पंचक्रोशी। चुके जन्म मरण चौऱ्यौंशी। चारी मुक्ती होती दासी। येवोनी चरणाशी लागती।। नाशिक| पुण्यपावन श्रीक्षेत्र सासवड संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही तीर्थभूमी, या सासवड तीर्थक्षेत्राची पंचक्रोशी प्रदक्षिणा प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी दि. १४ ऑक्टोबर रोजी सोमवार अश्विन शुद्ध एकादशीच्या पर्वकाळावर सकाळी श्री संत सोपानदेवांच्या समाधीस अभिषेक करून पंचक्रोशी प्रदक्षिणा दिंडीला प्रारंभ होणार असून  गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आश्विन वद्य अष्टमीला सकाळी श्री संत सोपानदेव मंदिर सासवड येथे ९ ते ११ काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. या पंचक्रोशी प्रदक्षिणामध्ये पूण्यपावन स्वयंभू शिवलिंग लवथळेश्वर, श्री क्षेत्र जेजुरी, श्री आद्य रामायणाचार्य वाल्मीक ॠषी संजीवन समाधी, श्री स्वयंभू शिवलिंग बनेश्वर देवस्थान, श्री भगवती जगदंबा कोंढणपूर योगिनी माता, कौंडण्यपूर्ण निक्षेप, योगिनी माता प्रत्यक्ष असे श्री संत नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये ज्यांचे वर्णन आहे पाश्चात ।।पूर्वी ब्रह्म याचे स्थान। येथे तप केले गहन। महादेव येऊन आपण। याशी प्रसन्न झाले ।।असे ब्रह्मयाने ...

उद्योग'रत्न' निखळलं : भावपूर्ण श्रद्धांजली

उद्योग'रत्न' निखळलं  उद्योगपती रतनटाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने, देशच नव्हे तर जगभर हळहळ व्यक्त झाली. रतनटाटा हे सामाजिक जाणिव असलेले उद्योगपती होते. उद्योग, व्यवसाय वाढवत असताना सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी राहिला. उदाहरण द्यायचे झाले तर १ लाखात सामान्य माणसाला नॅनो कार देणे हे रतन टाटांना शक्य झाले. त्यांनी नेहमी सामजिकभान राखलं. एवढ्या मोठ्या समुहाचे चेअरमन असताना त्यांनी सामाजिक उत्तरदायित्व व साधी सरळ जीवन पद्धती अवलंबली. उदरनिर्वाह व जगण्यासाठी जेवढया आवश्यक बाबी आहेत. त्याच स्वीकारल्या, झगमगाट व आलिशान जीवन पद्धतीला त्यांनी फारसे महत्व दिले नाही. त्यामुळेच एखाद्या सामान्य व्यक्तीलापण रतन टाटा आपलेसे वाटतात यातच त्यांचे मोठेपण आहे.  रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ साली मुंबईत पारसी कुटुंबात झाला. वडिल नवल टाटा व आई सोनू टाटा तसेच काका जमशेदजी टाटा यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. त्यांचे ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅपियन शाळेत तसेच उर्वरित शालेय शिक्षण शिमला व न्यूयॉर्क येथे झाले. कॉर्नेल महाविद्यालयातून वास्तूकला स्थानक पदवी मिळविली. टा...

त्र्यंबकेश्वर ट्रस्ट महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठाना साडी चोळी देऊन भरणार ओटी

त्र्यंबकेश्वर|दिअँकर वृत्तसेवा| श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे  लवकरच कोजागिरी पोर्णिमेपर्यंत महाराष्ट्रातील कोल्हापूर, माहूर व सप्तश्रुंग येथे साडी चोळी अर्पण केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळाततर्फे देण्यात आली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या तीर्थक्षेत्रांचा अतिशय पौराणिक संबंध आहे. धार्मिक कथा-परंपरेच्या आधारावर मागील अनेक वर्षापासून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या उगम स्थानाचे तीर्थ हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कावड धारकांच्या माध्यमातून दरवर्षी श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे पायी प्रवास करून नेले जाते. त्याची विधिवत पूजाविधी करून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आई श्री सप्तश्रृंगी मातेच्या अभ्यंग स्नानाला ते तीर्थजल वापरण्याची प्रथा सुरू आहे. तरी मागील वर्षापासून दरवर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील तीर्था बरोबर आई श्री सप्तशृंगी मातेला भरजरी वख- पैठणीसाडी (हातमागावर विणलेली १४ वारासह ४ वार स्वतंत्र चोळी) तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. या अनुषं...